Ayodhya Ram Mandir : अखेर तारीख ठरली! राम मंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा '15 जानेवारी 2024 ते 24 जानेवारी 2024 दरम्यान होणार

New Delhi: अयोध्येतील राम मंदिर जनतेसाठी कधी खुलं होणार, यावरून देशात चर्चांना उधाण आलं आहे. याचदरम्यान, अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेची तारीख समोर आली आहे. 15 जानेवारी 2024 ते 24 जानेवारी 2024 दरम्यान होणार राम मंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार, अशी माहिती समोर आली आहे.

प्राणप्रतिष्ठेनंतर राम मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले केले जातील, असं सांगण्यात येत आहे. १५ जानेवारी २०२४ ते २४ जानेवारी २०२४ दरम्यान राममंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होणार आहे.

प्राणप्रतिष्ठेनंतर राम मंदिरात नागरिकांना प्रवेश मिळू शकतो. विदेशातील भारतीय राजदूतांना देखील या कार्यक्रमाला आमंत्रित केलं जाणार आहे. तर गर्भ गृहाच्या मुख्य दाराला सोन्यानं आच्छादित केलं जाणार आहे. तसेच मंदिरांचं शिखरं १६१ फूट असणार आहे.

अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेचा सोहळा आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशातील बहुतांश मंदिरात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. अयोध्येतील राम मंदिराती श्रीरामाची प्राणप्रतिष्ठेआधी मंदिर निर्माणाचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात येणार आहे.

राम मंदिरासाठी गर्भ गृह तयार करण्यात येणार आहे. या गर्भ गृहाच्या दरवाज्याला सोन्याने मढविण्यात येणार आहे. तर मंदिराचा पहिला माळा तयार झाला आहे. तसेच गुरू मंडप देखील लवकरच तयार आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधीच या मंदिराच्या सोहळ्यातून संदेश देण्याची तयारी असल्याचंही बोललं जात आहे.

राम मंदिर निर्मितीचा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचे काम मोदी सरकारकडून करण्यात येत आहे. यासाठी मोदी सरकरारने विदेशातील भारतीय राजदूतांना देखील आमंत्रित केले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना रामललाचं दर्शन मिळणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply