Avinash bhosale : उद्योजक अविनाश भोसले यांना मोठा दिलासा; मुंबई हायकोर्टाकडून जामीन

Avinash bhosale : पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक अविनाश भोसले यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अविनाश भोसले यांना मुंबई उच्च न्यायालयाने अविनाश भोसले यांना जामीन मंजूर केला आहे. एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर भोसले यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

अविनाश भोसले यांना प्रसिद्ध यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. भोसले यांना न्यायालयाने एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

Nagpur News : ब्रँडेड कंपनीचे स्टिकर लावून तेल विक्री; नागपुरातील धक्कादायक प्रकार

सीबीआयच्या खटल्यामध्ये भोसले यांना हायकोर्टाने जामीन दिला आहे. तर मात्र, आणखी एका केसमध्ये जामीन होणे बाकी असल्याची माहिती मिळत आहे. येस बँक घोटाळा प्रकरणी 26 मे 2022 रोजी सीबीआयने अटक केली होती.

काय आहे प्रकरण?

अविनाश भोसले हे पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत. गेल्या दोन वर्षांपासून भोसले हे तुरुंगात आहेत. येस बँक आणि डिएचएफएल घोटाळा प्रकरणात सीबीआयने त्यांना अटक केली होती. अनियमती कर्ज दिल्याचा आरोप अविनाश भोसले यांच्यावर आरोप आहेत. त्यांनी काही महिन्यांपूर्वी देखील जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, कोर्टाने दिलासा देण्यास नकार दिला होता. त्यानंतर आज शुक्रवारी अविनाश भोसले यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.

सीबीआयने एका वर्षांपूर्वी ४०.३४ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त केली होती. तर ईडीने विदेशी मुद्रा प्रबंधन अधिनियमांतर्गत त्यांच्या एबीआयएल कंपनीच्या मुख्यालयावरही कारवाई केली होती. त्यानंतर ३० एप्रिल २०२२ रोजी भोसले यांच्या पुण्यातील एबीआयएल या कार्यालयावर 'सीबीआय'कडून छापा टाकला होता. त्यानंतर भोसले यांना २६ मे २०२२ रोजी अटक करण्यात आली होती.
 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply