Auto Rickshaw Drivers Strike : संभाजीनगरमध्ये सामान्यांचे हाल; रिक्षाचालकांचा संप, शहर बससेवा राेखून धरली

 

Auto Rickshaw Drivers Strike : हिट अँड रन कायद्याच्या निषेधार्थ  आज (बुधवार) छत्रपती संभाजीनगर येथे रिक्षा चालक मालक संघटनेने संप पुकारला आहे. या संपात बहुतांश रिक्षा चालक सहभागी झाले आहेत. परिणामी नागरिकांची गैरसाेय झाली आहे.

रिक्षा चालकांसाठी स्वतंत्र रिक्षा चालक कल्याणकारी महामंडळ, स्मार्ट सिटीच्या बस फक्त मनपा हद्दीदतच चालविण्यात याव्या यासारख्या विविध मागण्यांसाठी आज सकाळपासून रिक्षा चालकांनी संप तसेच चक्काजाम आंदोलन सुरु केले आहे. या संपाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेसाठी दहा रिक्षा ठेवण्यात आल्या आहेत.

Truck Driver Strike : मनमाडमधील पेट्रोल-डिझेल टँकर चालक पुन्हा संपावर; राज्यात पुन्हा इंधन टंचाईची शक्यता

या संप काळात शहरातील महत्त्वाच्या काही चौकामध्ये रिक्षा चालक-मालक संघटनेचे पदाधिकारी हे सुरु असलेल्या रिक्षातून प्रवासी उतरून घेत असल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यावरच ताटकळत उभे राहावे लागत आहे. त्यांची मोठी गैरसोय होत आहे.

परिणामी या संपामुळे सर्वसामान्य नागरिकांना स्मार्ट सिटीच्या शहर बसचा जरी आधार घ्यावा लागत असला तरी बस देखील रिक्षा चालकांनी अडविल्या आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply