
Uttar Pradesh Prayagraj : गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ खालिद अजीम अर्फ अशरफ या दोघांवर काल गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. पोलिसांसमोर तीन अज्ञात व्यक्तींनी या दोघांवर गोळ्या झाडल्या. या घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला. गोळ्या झाडल्यानंतर तिघांनीही सरेंडर केलं आहे. पोलिस सध्या या तिघांचीही कसून चौकशी करत आहेत.
अशात या प्रकरणी आता मोठ मोठे खुलासे होताना दिसत आहेत. लवेश तिवारी, अरुण मौर्य आणि सनी हमीरपुर अशी तिन्ही आरोपींची नावे आहेत. तिन्ही आरोपींनी या आधी देखील अनेक गुन्हे केले आहेत. हे तिघेही प्रयागराजमधील नसून आजूबाजूच्या गावात राहणारे आहेत. पोलिसांनी त्यांचे जबान नोंदवून घेतले आहेत. यामध्ये तिघांचे स्टेटमेंट वेगवेगळे असल्याचे समजत आहे.
प्रसिद्धिसाठी केली हत्या
गावात छोटे मोठे गुन्हे केल्याने या तिघांवरही वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या तिघांची चौकशी केली असता त्यांनी म्हटले आहे की, आम्ही छोटे गुन्हे करून थकलो होतो. छोट्या गुन्ह्यांनी फार प्रसिद्धि मिळवता येत नाही. त्यामुळे आम्ही काही तरी मोठं आणि वेगळं करण्याचा विचार केला. याच कारणास्तव आम्ही अतिक आणि अशरफ या दोघांची हत्या केली, असं आरोपींनी पोलिसांना सांगितलं आहे.
मात्र तिघांनीही केलेल्या या दाव्यावर सध्या विश्वास ठेवणे कठीण असल्याचे पोलिस म्हणाले आहेत. कारण तिन्ही आरोपींनी या प्रकरणावर वेगवेगळे वक्तव्य केले आहेत. हत्येची घटना घडल्यानंतर योगी सरकारमार्फत घटनेच्या उच्च स्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच उत्तर प्रदेशमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
अतिकचे शेवटचे शब्द...
माध्यम प्रतिनिधींनी अतिकला विचारलं की, तुम्हाला अंत्ययात्रेत नेलं नाही, याबद्दल तुम्हाला काही बोलायचं आहे का? अतिक म्हणाला," हा आम्हाला नेलं नाही. पण मुख्य गोष्ट ही आहे की..." बस यापुढे अतीक अहमद काही बोलणार तितक्यात त्याच्यावर आणि अशरफवर गोळ्या झाडण्यात आल्या. या दोघांवर ज्या गोळ्या झाडल्या त्यात या दोघांचा जागीच मृत्यू झाला.
अतिक अहमद याचा मुलगा असद याचंही दोन दिवसांपूर्वी एन्काऊंटर करण्यात आलं होतं. त्याचे अंत्यसंस्कार कडक पोलीस बंदोबस्तात पार पडले. या अंत्यसंस्काराला केवळ २५ लोक उपस्थित होते, तसंच ड्रोनद्वारे यावर नजर ठेवण्यात आली होती.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

