ATF च्या किंमतीत वाढ, विमान प्रवास होऊ शकतो महाग

शनिवारी विमानात इंधन म्हणून वापरल्या जाणाऱ्या एटीएफ (Aviation Turbine Fuel) च्या किमतीतही 0.2 टक्क्यांनी वाढ करण्यात आली. त्यामुळे विमानाने  प्रवास करणे आता महागात पडू शकते. एटीएफच्या (ATF) किमतीत झालेली ही सलग आठवी वाढ आहे

सार्वजनिक तेल कंपन्यांनी जारी केलेल्या माहितीनुसार, शनिवारी एटीएफच्या किंमतीत 277.5 रुपये प्रति किलोलीटर म्हणजेच 0.2 टक्के वाढ करण्यात आली आहे. साहजकिच या दरवाढीचा परिणाम विमान प्रवासावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विमान प्रवास तिकीट दर वाढू शकतो.

16 मार्च रोजी एटीएफच्या किमती तब्बल 18.3 टक्क्यांनी वाढल्या होत्या. त्यानंतर 1 एप्रिल रोजी त्याच्या किमतीत दोन टक्क्यांनी वाढ करण्यात आली. तथापि, ताज्या दरवाढीनंतर,मुंबईत  ATF ची किंमत आता प्रति किलो 1,11,981.99 रुपये झाली आहे, तर कोलकत्यात त्याची किंमत 1,17,753.60 रुपये आणि चेन्नई मध्ये 1,16,933.49 रुपये प्रति किलोलीटर झाली आहे. राजधानी दिल्लीत एटीएफच्या किमती 1,13,202.33 रुपये प्रति किलोलीटरवर गेल्या आहेत. अशा प्रकारे एटीएफची किंमत विक्रमी पातळीवर पोहोचली आहे.

एटीएफच्या किमतीतील वाढ हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीचा परिणाम आहे. त्यामुळे विमान प्रवास तिकीट दराकडे सर्वांचे लक्ष वेधले आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply