Atal Setu News : अटल सेतूचा प्रवास होणार अर्ध्या किमतीत, मुंबईकरांना दिलासा; ५० टक्क्यांनी घट

Atal Setu News : अटल सेतूकडे प्रवाशांनी पाठ फिरवली असताना, नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन विभागानं एक मोठा निर्णय घेतला आहे. आता सामान्यांना किमान दरात प्रवास करता येणार असून, टोल दरात ५० टक्क्यांनी घट झाल्याची माहिती आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन विभागानं टोल दरात कपात केल्यामुळं, या मार्गावरील प्रवासी संख्येत लक्षाणीय वाढ झाल्याची माहिती आहे.

हिंदुस्थान टाइम्सच्या वृत्तानुसार, खारगर - मंत्रालयापर्यंतच टोल २७० रूपयांवरून १२० रूपये करण्यात आलं आहे. तर नेरूळ - मंत्रालयापर्यंतचे टोल २३० रूपयांपासून १०५ रूपयांवर घसरले. या संदर्भात नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन विभागाचे अधिकारी सांगतात, 'अटल सेतूवरील टोल दरात लक्षणीय घट करण्यात आली आहे. किमान टोल आकारल्यानं, ११६ मार्गासाठी प्रवाशांची सरासरी संख्या २० ते ६० प्रवाशांनी वाढ झाली आहे. तर ११७ मार्गासाठी प्रवाशांची संख्या २० ते २५ वरून ७० पर्यंत वाढल्याची माहिती आहे.'

Pimpri-Chinchwad : मला माफ करा, आत्महत्येआधी व्हिडिओ व्हायरल केला; मग रिक्षाचालकानं संपवलं आयुष्य

सुरुवातीला अधिकच्या टोल खर्चामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन विभागानं, गणेशोत्सवादरम्यान अटल सेतुवर बससेवा सुरू केली होती. ही बससेवा ११६ आणि ११७ या मार्गावर चालू करण्यात आली होती. परंतू सुरुवातीलाच इथल्या तिकीट दरांनी सामान्यांना धडकी भरवली होती. त्यामुळे या मार्गाकडे अनेक प्रवाशांनी पाठ फिरवली. मात्र, तिकीट दरात ५० टक्क्यांनी कपात केल्यानं प्रवाशांनी पुन्हा एकदा या मार्गावरील बससेवेला पसंती दर्शवली आहे.

प्रवाशांचा अल्प प्रतिसाद

अटल सेतुवरून २०२४ या वर्षात वाहतूक अपेक्षापेक्षा मोठ्या फरकानं कमी झाल्याचे निर्दशनास आले. १३ ऑक्टोबर ते ३० डिसेंबरपर्यंत या कालावधीत अटल सेतूवरून ७९८०५५३ वाहनांनी प्रवास केल्याची नोंद आहे. एमएमाआरडीएनं प्रसिद्धी पत्रातून यासंदर्भातली माहिती देत दर दिवसाला येथून सरासरी २२६०७ वाहनं प्रवास करत असल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र हा आकडा ३९ हजार अपेक्षित असल्यानं, वर्षाभरातील एकूण वाहनसंख्या ४२ टक्क्यांनी घटली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply