Assam-Meghalaya सीमेवर मोठा हिंसाचार; गोळीबारात वनरक्षकासह 6 जणांचा मृत्यू, 7 जिल्ह्यांत इंटरनेट सेवा बंद

गुवाहाटी : आसाम-मेघालय सीमेवर लाकूड तस्करी  बंद असताना मंगळवारी पहाटे हिंसाचार झाला. या हिंसाचारात वनरक्षकासह सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी आसाम-मेघालय सीमेवर बेकायदेशीर लाकूड वाहून नेणारा ट्रक रोखल्यानंतर हा हिंसाचार झाला, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. खबरदारीचा उपाय म्हणून 7 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा (Internet service) बंद करण्यात आलीय. पश्चिम कार्बी आंगलाँगचे पोलीस अधीक्षक इमदाद अली यांनी ही माहिती दिली.

इमदाद अली यांनी सांगितलं की, आसाम वन विभागानं (Assam Forest Department) मेघालय सीमेवर ट्रक थांबवला होता. ट्रकचालकानं पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याला रोखण्यासाठी वनरक्षकांनी गोळीबार केला. या गोळीबारात ट्रकचा टायर पंक्चर झाला. यानंतर वनरक्षकांनी ट्रक चालकासह तिघांना पकडलं. मात्र, इतर पळून जाण्यात यशस्वी झाले.

हिंसाचारामुळं 7 जिल्ह्यांत इंटरनेट सेवा बंद

या घटनेची माहिती नजीकच्या पोलीस ठाण्यात देण्यात आली असून अतिरिक्त पोलीस बंदोबस्ताची मागणी करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. पहाटे पाच वाजता पोलीस येताच काही स्थानिक लोक हातात शस्त्रं घेऊन तिथं पोहोचले. तस्करांना सोडण्याची मागणी करत जमावानं वनरक्षक आणि पोलिसांना घेराव घातला. बचावासाठी जमावावर गोळीबार करावा लागला. या गोळीबारात वनरक्षकाचा मृत्यू झाला. त्याशिवाय, मेघालयातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर, खबरदारीचा उपाय म्हणून मेघालयातील सात जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आलीय.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *