Ashwini Bidre Case : मोठी बातमी! अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणातील आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप

Ashwini Bidre Case : सहाय्यक पोलिस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणाचा निकाल आज लागला. या प्रकरणातला मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसंच त्याला २० हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आला आहे. पनवेल सत्र न्यायालयात आज सुनावणी पार पडली.

त्याचसोबत या प्रकरणातील इतर दोन आरोपी कुंदन भंडारी आणि महेश फाळणीकर या दोघांना न्यायालयाने ७ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. २०१६ मध्ये अश्विनी बिद्रे यांची हत्या करण्यात आली होती. अभय कुरुंदकरने अश्विनी बिद्रे यांची हत्या करून आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली होती.

Shocking News: झिपलायनिंग करणं जीवावर बेतलं, ३० फूट उंचीवरून पडून तरुणीचा मृत्यू

कोल्हापूर जिल्ह्यातील आळते इथल्या सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणी आज मुख्य आरोपी आणि बडतर्फ वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकरसह त्याचे साथीदार कुंदन भंडारी आणि महेश फाळणीकर यांना पनवेल सत्र न्यायाधीशाने दोषी ठरविले आहे. दोषी अधिकाऱ्यांसह साथीदारांना आज न्यायालयाने शिक्षा सुनावली. न्यायालयाने कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा आणि २० हजार रुपयांचा दंड ठोठावला.

तर इतर दोन आरोपी कुंदन भंडारी आणि महेश फाळणीकर या दोघांना ७ वर्षांची शिक्षा सुनावली. पण या दोन्ही आरोपींची शिक्षा पूर्ण झाल्यामुळे त्यांना तुरूंगातून सोडण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. याप्रकरणी दोघांना अटक करून ७ वर्षे झाली आहेत. त्यामुळे दोन्ही आरोपींची ७ वर्षांची शिक्षा पूर्ण झाल्यामुळे दोघांचीही सुटका करण्यात येणार आहे. लवकरच त्यांची रिलीज ऑर्डर काढण्यात येणार आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply