Ashok Chavan : नांदेडमध्ये मराठा समाज आक्रमक; अशोक चव्हाणांना घेराव, गावात येण्यास मज्जाव

Ashok Chavan : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सूचना दिल्या असून देखील मराठा आरक्षणाची धग अजूनही कायम आहे. याचीच प्रचिती नांदेड जिल्ह्यातून समोर आली आहे. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी माजी मुख्यमंत्री तथा भाजपाचे खासदार अशोकराव चव्हाण यांना गावातून बाहेर जाण्यास सांगितलं आहे.

प्रतापराव पाटील चिखलीकर यांना भाजपकडून नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाली आहे. प्रचाराच्या अनुषंगाने अशोकराव चव्हाण कोंढा गावात मतदारांच्या भेटीगाठीसाठी आले होते. यावेळी 'एक मराठा-लाख मराठा' सह विविध घोषणा देत गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला.
 

प्रतापराव पाटील चिखलीकर आणिअशोकराव चव्हाण आल्यावर गावकरी मोठ्या संख्येने जमा झाले होते. शेकडो जणांचा रोष पाहून अशोक चव्हाण यांनीही काढता पाय घेतला. नांदेड जिल्ह्यात येणाऱ्या काळात विविध पक्षाच्या नेत्यांना गावबंदीचा फटका बसण्याची शक्यता असून प्रचार काळात मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागणार अशी चिन्हे दिसत आहेत.

मराठा आरक्षणामध्ये सगेसोयरे अंमलबजाणीसाठी मनोज जरांगे पाटील आजही आग्रही आहेत. सध्या कोणत्याही गावात नेत्यांना गावबंदी नाही, मात्र काही ठिकाणी मराठा बांधवांचा असा रोष पाहायला मिळतोय. याआधी देखील आरक्षणाच्या मुद्द्यवरून विविध नेत्यांना गावात प्रवेश दिलेला नाही. आता भाजपाचे खासदार अशोकराव चव्हाण यांना देखील गावात आल्यावर मराठा बांधवांनी संताप व्यक्त केलाय.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply