Ashadhi Wari 2024 : अश्वांची नेत्रदीपक दौड सोहळ्यात चैतन्य; ज्ञानेश्वर माउलींच्या सोहळ्यात वेळापूरजवळ वारकऱ्यांचा धावा

Velapur : नेत्रदीपक दौडीने माउलींच्या अश्वाने रंगविलेल्या रिंगणानंतर पंढरी समीप आल्याच्या भावनेने वारकऱ्यांनी केलेला धावा आणि त्यानंतर वेळापूरच्या माळरानावर अंधश्रद्धेवर कोरडे ओढणाऱ्या लोकजागरणातून प्रबोधन करणारे भारुडाचे कार्यक्रम अशा चैतन्यमयी वाटचालीनंतर वैष्णवांचा दळभार वेळापूर मुक्कामी विसावला. माळशिरसकरांचा निरोप घेऊन सकाळी माउलींचा पालखी सोहळा वेळापूरकडे मार्गस्थ झाला. ढगाळ वातावरणात अधून मधून पावसाचा शिडकाव्याने वारकऱ्यांना चालण्यास बळ मिळत होते. हरिनामाचा गजर करीत सोहळा खुडूस

फाट्यावर आला. आज सोहळ्यातील दुसरे रिंगण होणार असल्याने वारकऱ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण होते. तेथील रिंगणात स्थापुढील २७ आणि रथामागील दिंड्या गोलकार उभ्या राहिल्या.

Pandharpur Ashadhi Yatra : आषाढी यात्रेसाठी पंढरपुरात तीन लाख भाविक दाखल; दर्शन रांगेचे दहा पत्रा शेड हाउसफुल्ल

दिड्यातून वाट काढीत पालखी मध्ये विराजमान झाली. यावेळी सोहळाप्रमुख योगी निरंजननाथ, प्रमुख विश्वस्त अड. राजेंद्र उमाप, डॉ. भावार्थ देखणे, सोहळ्याचे मालक राजाभाऊ आरफळकर, बाळासाहेब चोपदार, राजाभाऊ चोपदार, रामभाऊ चोपदार उपस्थित होते. रिंगणामध्ये रांगोळ्याच्या पायघड्या घातल्या होत्या. त्यानंतर प्रत्यक्ष रिंगणाला प्रारंभ झाला, भोपळे दिडीच्या मानकऱ्याने रिंगणात तीन फेन्या मारल्या. त्यानंतर दोन्ही अश्वानी दोड सुरूकेली

बेफाम वेगात माउलींनी स्वारापुढे दौड घेत तीन फेऱ्या मारुन भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. त्यानंतर रिंगणात दिंड्यांमध्ये खेळ रंगले, उडीच्या खेळानंतर सोहळा पुढे मार्गस्थ झाला. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दुपारी जेवणासाठी निमगाव पाटीवर थांबलात तेथे भोजन उरकून सोहळा वेळापूरकडे निघाला. धावाबावी माउंटजवळील उतारावर चोपदार बंधूनी तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा म्हणत एकएक दिंडी धावत खाली सोडली. प्रत्येक दिंडी, अश्व, रथ धावत खाली येत होता. यामध्ये अबालवृद्ध वारकरी सहभागी झाले

धावाबावी माउंट उतार उतरताच पालखीसमोर शेडगे दिंडी नंबर तीनच्या वतीने मानाचे भारुड झाले. यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे आणि ज्येष्ठ भारुडकार लक्ष्मण महाराज राजगुरू यांच्या यांनी भारुड सादर केले. एकनाथ महाराजांनी केलेल्या भारुडांचे दाखले देत दोघाही भारुडकारांनी हजारो भाविकांसमोर भारुडातून अंधश्रद्धेवर टीका केली. मी आलो रायाचा जोशी व्होरा ऐका दादानो हे डॉ. देखणे यांनी भारूड सादर केले. येथे संस्थानचे मानकरी, विश्वस्तांसह शेडगे दिंडीचे मानकरी ऋषिकेश मोरे उपस्थित होते. येथील माळरानावर दिड्यांमध्ये भारुडांचे कार्यक्रम सुरू होते. त्यातूनही जनप्रबोधन करण्यात येत होते



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply