Ashadhi Wari 2023 : संत मुक्ताई पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान

मुक्‍ताईनगर (जळगाव) : आषाढी वारी निमित्त राज्यभरातील विविध संतांच्या पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान करतात. दरम्यान सर्वात प्रथम खानदेशातून मुक्ताईनगर येथून आदिशक्ती संत मुक्ताई पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे. दरम्यान आज मुक्ताईनगर कोथळी येथील मुक्ताईच्या समाधी स्थळावरून पालखी सोहळा  हा पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. त्यानिमित्त मुक्ताईच्या मंदिरात वारकऱ्यांची व भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून भजन किर्तनाच्या धार्मिक महोत्सवा विठुरायाच्या गजरात वारकऱ्यांची मांदियाळी मुक्ताईनगरमध्ये पाहायला मिळत आहे. या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने वारकरी आपल्या लाडक्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी सज्ज झाले आहेत.

आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी म्हटले जाते. काही ठिकाणी ही तिथी पद्मनाभा एकादशी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रात आषाढी एकादशीचे महत्त्व असल्‍याने विठ्ठल भेटीची ओढ लागलेले वारकरी पंढरपुरात दाखल होतात. राज्यातील विविध भागांतून लाखों वारकरी पायी पंढरपूरला जातात. संत ज्ञानेश्वरांपासून ते जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांपर्यंत अनेक संतांच्या पालख्या पंढरपूरला मार्गस्थ होतात.

३४ दिवसांचा प्रवास

३४ दिवसांचा प्रवास करून तापी तिरावरून भीमा तीरावर ही पालखी जाणार आहे. ३४ गावांच्या प्रवासात प्रत्येक मुक्कामाठिकाणी भजन, कीर्तन,प्रवचन आणि प्रसाद आयोजित केला जातो. यामध्ये स्थानिक ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात.आषाढी एकादशी निमित्ताने सर्व संतांच्या पालख्या या वाखारी येथे एकत्र येत असतात. या ठिकाणी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात या सर्व पालख्यांचे स्वागत केले जात असते.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply