Ashadhi Ekadashi : 120 सीसीटीव्ही कॅमेरेतून पंढरपूरवर ठेवली जातेय नजर, आषाढीसाठी पाेलिस दल सज्ज

Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी यात्रा सोहळ्याची पंढरपुरात लगबग सुरू झाली आहे. आत्तापासूनच भाविकांची पंढरीत माेठी गर्दी हाेऊ लागली आहे. वारीसाठी आलेल्या भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून शहरात 120 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.

यंदा आषाढी एकादशी दिवशी भाविकांची लाखाेंच्या संख्येने पंढरीत गर्दी हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा प्रथमच माेठ्या संख्येेने सीसीटीव्ही कॅमेरे शहरात उभारण्यात आले आहेत. या सीसीटीव्ही कॅमेरावरुन गर्दीवर नियंत्रण ठेवणे, गर्दीच्या ठिकाणी पाेलिसांशी संपर्क साधणे असे कंट्राेल रुममधून केले जाणार आहे.

अरुण फुगे (पोलीस निरीक्षक, पंढरपूर) म्हणाले पंढरपूर शहर पोलीस ठाण्यातून याचे नियंत्रण केले जात आहे. चंद्रभागा वाळवंट, नगर प्रदक्षिणा , मंदिर परिसर ,शहरातील मुख्य रस्ते ,चौक अशा सर्वच ठिकाणी हे सीसीटीव्ही कॅमेरे तीर्थक्षेत्र विकास आराखड्या अंतर्गत पाच कोटी रुपये खर्चून लावण्यात आले आहेत.

त्यामुळे पंढरीत पाेलिसांची आता आणखी करडी नजर राहणार आहे. दरम्यान कुठेही गर्दीत भाविकांच्या जीवितास धोका होऊ नये, अनुचित प्रकार घडू नये यासाठी यंदाच्या वारीत प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने कॅमेऱ्याची नजर संपूर्ण वारीवर आणि भाविकांच्या गर्दीवर असणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply