Asaduddin Owaisi : लोकसभेत शपथ घेताना ओवेसी म्हणाले, 'जय पॅलेस्टाईन', वाद निर्माण होण्याची शक्यता

Asaduddin Owaisi : एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी 18 व्या लोकसभेच्या कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी खासदार म्हणून शपथ घेतली. शपथ घेताना ओवेसींनी 'जय पॅलेस्टाईन'चा नारा दिला आहे. यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहेत.

प्रोटेम स्पीकरने असासुद्दीन ओवेसी यांना लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेण्यासाठी बोलावले. यानंतर ओवेसी आले आणि खासदार म्हणून शपथ घेतली. खासदारपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी बाहेर पडताना जय भीम, जय तेलंगणा आणि नंतर जय पॅलेस्टाईनचा नारा दिला. त्यांनी हा नारा दिल्यानंतर भाजप खासदारांनी संसदेत गदारोळ सुरू केला

Arvind Kejriwal : केजरीवालांना दिल्ली उच्च न्यायालयाचा झटका; न्यायालयाकडून जामीन रद्द

हैदराबाद लोकसभा मतदारसंघातून असदुद्दीन ओवेसी सलग पाचव्यांदा विजयी झाले आहेत. यावेळी असदुद्दीन ओवेसी यांना 6,61,981 मते मिळाली आणि त्यांनी भाजपच्या उमेदवार माधवी लता यांचा 3,38087 मतांनी पराभव केला. आधी 2019 च्या निवडणुकीत ओवेसी यांनी एकूण 58.95 टक्के मतांसह विजय मिळवला होता.

दरम्यान, लोकसभेचे पहिले अधिवेशन सोमवारी (२४ जून) सुरू झाले/ ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीए सरकारच्या मंत्रीपरिषदेचे सदस्य, तसेच इतर नवनिर्वाचित सदस्यांनी सभागृहाचे सदस्य म्हणून शपथ घेतली.

प्रोटेम स्पीकर भर्तृहरी महताब यांनी सभागृहाचे कामकाज सुरु करत सदस्यांना शपथ दिली. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान मोदी सलग तिसऱ्यांदा सत्तेत परतले आहेत. मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने ९ जून रोजी शपथ घेतली.
 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply