Arvind Kejriwal : 'अटक आणि रिमांड दोन्ही बेकायदेशीर, तात्काळ सुटका करा', केजरीवाल यांची हायकोर्टात धाव

Arvind Kejriwal : कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने गुरुवारी अटक केली. त्यांच्या अटकेनंतर राऊस एव्हेन्यू कोर्टाने केजरीवाल यांना दिलासा देण्यास नकार दिला असून त्यांना 28 मार्चपर्यंत ईडी कोठडीत पाठवले आहे. यातच आता केजरीवाल यांनी ईडीच्या अटकेला आणि रिमांडला हायकोर्टात आव्हान दिले आहे.

केजरीवाल यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत ईडीचा अटक आणि कोठडीचा आदेश दोन्ही बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद केला आहे. यामुळे ईडीच्या कोठडीतून तात्काळ सुटका करण्यात यावी, असं त्यांनी याचिकेत म्हटलं आहे. केजरीवाल यांनी हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींकडे रविवार 24 मार्चपर्यंत तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली आहे. 

Pune Police : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीसांची मोठी कारवाई; एकाच दिवशी 12 सराईत गुन्हेगार तडीपार

दरम्यान, ईडीने कोर्टात दावा केला की, केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाद्वारे पैसे लाँडर करण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री असल्याचा गैरफायदा घेतला. ते मद्य धोरण घोटाळ्यातील मोठे लाभार्थी आहेत. केजरीवाल यांच्या कोठडीची मागणी करत ईडीने कोर्टात सांगितले की, ''अरविंद केजरीवाल हे मद्य धोरण घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार आहेत.ईडीने केजरीवाल यांची 10 दिवसांची कोठडी मागितली होती. यावेळी त्यांनी केजरीवाल यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील अभिषेक सिंघवी यांनी दावा केला की, मद्य धोरण प्रकरणात 200 हून अधिक छापे टाकूनही, आप नेत्याचा गुन्ह्यात सहभाग दर्शविणारा कोणताही पुरावा नाही. कोणतेही आक्षेपार्ह साहित्य सापडले नाही.

ते म्हणाले की, ''दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मद्य धोरणात काही चुकीचे केले किंवा कोणताही फायदा मिळवला हे सिद्ध करण्यासाठी कोणताही पुरावा किंवा सामग्री नाही. ईडीने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत (पीएमएलए) राजकीय सूड उगवण्यासाठी आपल्या अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांनी केला.'' असं असलं तरी कोर्टाने केजरीवाल यांना 7 दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. यालाच आता केजरीवाल यांनी हायकोर्टात आव्हान दिले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply