Arvind Kejriwal : नव्या समन्सकडेही केजरीवालांचे दुर्लक्ष

नवी दिल्ली : दिल्ली जलमंडळातील कथित गैरव्यवहाराच्या अनुषंगाने सक्तवसुली संचालनालयाने बजावलेल्या पहिल्या नोटिसीकडे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पाठ फिरवली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सोमवारी हजर रहावे, असे समन्स ‘ईडी’ने बजावले होते.मात्र केजरीवाल चौकशीला हजर राहिले नाहीत. न्यायालयाकडून जामीन देण्यात आलेला असताना केजरीवाल यांना वारंवार का समन्स बजावले जात आहेत, असा सवाल ‘आप’ने उपस्थित करतानाच, ईडीचे समन्स बेकायदा असल्याचा दावा केला आहे. केजरीवाल यांना एकाचवेळी दोन प्रकरणांत ‘ईडी’ने समन्स बजावले होते. दरम्यान, केजरीवाल यांच्यावर भाजपने टीका केली आहे.

केजरीवाल हे सतत चौकशीपासून दूर पळत आहेत, याचा अर्थ त्यांचा गैरव्यवहाराशी संबंध असल्याचे स्पष्ट होते, असे दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी सांगितले.

Mumbai Breaking News : वडापाव विक्रेत्याचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न; इमारतीवरून उडी मारली, जाळीवर पडला

सत्येंद्र जैन यांना नियमित जामीन नाही

आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र जैन यांना नियमित जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. जामिनाबाबतच्या सर्व याचिका फेटाळल्या जात असून जैन यांनी तत्काळ आत्मसमर्पण करावे, अशी टिपणी खंडपीठाने सुनावणी दरम्यान केली.

सत्येंद्र जैन यांच्या नियमित जामीन अर्जावरील युक्तिवाद गेल्या जानेवारी महिन्यात पूर्ण झाला होता. त्यावेळी न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. हवाला प्रकरणात गंभीर आरोप असलेल्या जैन यांना मागील वर्षी सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय आधारावर जामीन दिला होता. आज जामीन नाकारल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार जैन यांनी तिहार तुरुंगामध्ये आत्मसमर्पण केले.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply