Anil Deshmukh : माझ्यावरील कारवाईमागे विदर्भातील बडा नेता.. अनिल देशमुख यांचा खळबळजनक दावा

Anil Deshmukh : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. गृहमंत्री असताना माझ्यावर जे १०० कोटींचा आरोप झाले ते एका पक्षाने करायला लावले असा खळबळजनक गौप्यस्फोट अनिल देशमुख यांनी केला आहे. तसेच सरकारने या प्रकरणातील चांदीवाल अहवाल जनतेसमोर आणला नाही, तर कोर्टात जाणार असल्याचा इशाराही अनिल देशमुख यांनी दिला आहे.

"गृहमंत्री असताना माझ्यावर जे १०० कोटींचा आरोप झाले. ते एका पक्षाने करायला लावले. मी तत्कालीन मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांना चौकशी करण्यासाठी पत्र दिलं होते. माजी न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाचा दीड वर्षापूर्वीचं रिपोर्ट आलाय. मात्र या सरकारने तो विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात आला नाही. मी राज्यपालांना देखील पत्र लिहिलं. मात्र त्यांनी देखील यात लक्ष घातलं नाही, अधिवेशन संपलेल असलं तरी पुढील काळात तो अहवाल शासनाने सादर करावा," असे अनिल देशमुख म्हणाले.

Namo Rojgar Melava : मदभेद आहेत, मात्र मनभेद नाहीत; नमो रोजगार मेळाव्यात सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? जाणून घ्या

तसेच "हा अहवाल सादर होऊ नये, यामागे विदर्भातीलच मोठे नेते आहेत. वेळ आल्यावर नाव सांगेल. माझा पक्ष माझ्यासोबत आहे. ३ वर्षांपूर्वी मी जर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे एफेडेविट केले असते तर माझ्यावर कारवाई झाली नसती. त्यातील ४-५ मुद्दे असे होते, त्याच दिवशी सरकार पडले असते," असा खळबळजनक दावाही अनिल देशमुख यांनी केला.

"महाराष्ट्रातील भाजपच्या एका मोठ्या नेत्याने मला एफेडेविट करून देण्यास सांगितले. ते म्हटले की तुम्ही एफेडेविट करून द्या, ईडी सीबीआय चौकशी होणार नाही. मला माझ्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर आरोप करण्यास सांगितले होते. मी ते केले असते तर सरकार कोसळलं असते. याबाबतची माहिती योग्यवेळी सादर करणार आहे. पेनड्राइव्ह दाखवणार आहे. सरकारने चांदीवाल अहवाल जनतेसमोर आणला नाही, तर कोर्टात जाणार.." असे अनिल देशमुख म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply