Anil Babar Passed Away : शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं निधन; राजकीय वर्तुळातून हळहळ

Anil Babar Passed Away : शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे निधन झालं आहे. वयाच्या ७४ व्या वर्षी बाबर यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. अनिल बाबर हे खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. न्यूमोनिया झाल्याने त्यांना मंगळवारी (३० जानेवारी) दुपारी त्यांना सांगलीतील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, बुधवारी पहाटेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आमदार अशी बाबर यांची ओळख होती. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर महाविकासआघाडी सरकारमध्ये उघडपणे नाराजी व्यक्त करत आमदार बाबर यांनी एकनाथ शिंदे यांना साथ देत शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला होता.

Pune Accident News : धक्कादायक! पुण्यात कारच्या धडकेत पेंटिंग कामगार पुलावरून कोसळले, दोघांचा जागीच मृत्यू

गुवाहाटी वारीत अनिल बाबर हे सुरुवातीपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत होते. शिवसेना १६ आमदार अपात्र प्रकरणात अनिल बाबर यांचं नाव आघाडीवर होतं. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. 

२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अनिल बाबर खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांनी अपक्ष उभा राहिलेल्या सदाशिव पाटील यांचा पराभव केला होता. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बाबर यांनी वयाच्या 19 व्या वर्षी राजकारणात पाऊल ठेवलं होतं.

खानापूर तालुक्यातील गर्दी गावाचे सरपंच म्हणून ते निवडून आले होते.  टेंभू योजना पूर्णत्वाकडे नेण्यात त्याचा मोलाचा वाटा मानला जातो. अनिल बाबर हे १९९०, १९९९, २०१४, २०१९ असे चार वेळा ते आमदार राहिले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना असा राजकीय प्रवास आहे



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply