Anant Bhave : मराठी साहित्याचा शिलेदार काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ मराठी साहित्यिक अनंत भावे यांचे निधन

Anant Bhave : ज्येष्ठ मराठी साहित्यिक अनंत भावे यांचे निधन झालं आहे. ज्येष्ठ मराठी साहित्यिक आणि 'दूरदर्शन'वरील प्रसिद्ध वृत्तनिवेदक प्रा. अनंत भावे यांनी वयाच्या ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अंनत भावे यांचं रविवारी पुण्यात अल्पशा आजाराने निधनं झालं.

प्रा. अनंत भावे यांना बालसाहित्यामधील योगदानासाठी २०१३ साली साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. भावे हे पुण्यातील बाणेर येथे वास्तव्यास होते. त्यांच्या पत्नी पुष्पा भावे यांचं चार वर्षांपूर्वी निधन झालं होतं. अनंत भावे यांच्या निधनाने साहित्य वर्तुळात शोककळा पसरली आहे.

प्रा. अनंत भावे यांनी मुंबईतील सोमय्या महाविद्यालयात मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून काम पाहिलं. भावे यांचं मराठी भाषेवर उत्तम प्रभुत्व होतं. त्यांनी स्पष्ट शब्दोच्चार आणि आपल्या भाषा शैलीने 'दूरदर्शन'वर वृत्तनिवेदक म्हणून स्वत:चा वेगळा ठसा उमटविला. 'अज्जब गोष्टी गज्जब गोष्टी', 'अशी सुट्टी सुरेख बाई', कासव चाले हळूहळू', 'चल रे भोपळ्या टुणूक टुणूक', 'चिमणे चिमणे' अशी त्यांची ५० हून अधिक बालवाङ्‌मय आणि कविता या प्रसिद्ध झाल्या आहेत.

अनंत भावे यांनी साप्ताहिक 'माणूस' मध्ये स्तंभलेखन केले. त्यांनी विविध वृत्तपत्रात सदर लिहिले. प्रा. अनंत भावे यांना बालसाहित्यात मोठं योगदान दिलं. त्यांच्या निधनाने मराठी साहित्यविश्वात पोकळी निर्माण झाली आहे.

शरद पवार यांनी मराठी साहित्यिक प्रा. अनंत भावे यांनी श्रद्धांजली वाहिली. शरद पवार म्हणाले, ' ज्येष्ठ साहित्यिक, दूरदर्शनचे माजी वृत्तनिवेदक आणि साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित प्रा. अनंत भावे यांचे दुःखद निधन झालं. भावे यांचं मराठी बाल साहित्यात फार मोठं योगदान आहे. ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे बदलत्या काळानुरूप बदलती विद्यार्थ्यांची आवड यांची सांगड घालून त्यांनी केलेले कसदार लिखाण कायम स्मरणात राहील. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली'.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply