Amravti Accident : भीषण अपघात; सहा जणांचा मृत्यू, १२ जण गंभीर जखमी

अमरावती : महाराष्ट्र- मध्यप्रदेश सीमेवर ट्रक व चार चाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर १२ जण गंभीर जखमी झाले आहेत.

महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर असलेल्‍या धारणी भोकरबर्डी सीमेवरील देळतलाई शेखपुरा रोडवर ट्रक व चार चाकी गाडीचाअपघात झाला. उसाने भरलेला ट्रक मजूर घेऊन जात होता. यावेळी समोरून आलेल्‍या गाडीने समोर जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की सहा जणांचा जागीच मृत्‍यू झाला.

ट्रक व पिकअप गाडीची समोरा समोर धडक झाल्‍याने गाडीत बसलेले मजूर फेकले गेले. यात सहा जणांचा मृत्‍यू झाला. १२ जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना मध्य प्रदेशातील खंडवा बुरहानपुर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *