Amravati News : बळीराजा थांब रे...! अमरावतीत ३ महिन्यात ८८ शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळलं; धक्कादायक आकडेवारी समोर

Amravati News : अमरावती जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. दोन दशकात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या यंदाच्या मार्च महिन्यात झाल्या आहेत. अमरावती जिल्ह्यामध्ये मागील तीन महिन्यांत ८८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. तर सर्वाधिक आत्महत्या मार्च महिन्यात झालेल्या आहेत. जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.

प्रशासन आणि राजकारण निवडणुकीमध्ये व्यस्त असल्याने शेतकरी वाऱ्यावर आहेत. अशा परिस्थितीत यंदाच्या मार्च महिन्यात अमरावती जिल्ह्यात तब्बल ३६ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याचं समोर आलं आहे. राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यात होत आहेत. त्यातच अमरावती जिल्ह्यात दोन दशकातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या मार्च महिन्यात झालेल्या आहेत.

Malad Fire News : मालाडमध्ये ८ मजली इमारतीला भीषण आग; १४ जण घुसमटले, तिघांची प्रकृती चिंताजनक

यंदाच्या तीन महिन्यात तब्बल ८८ शेतकरी आत्महत्या अमरावती जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत. यापैकी फक्त एका शेतकऱ्याला शासन मदत देण्यात आलेली आहे. यामध्ये ८१ प्रकरणे अजूनही चौकशीसाठी प्रलंबित आहे. यंदा जानेवारी महिन्यात २४, फेब्रुवारी २८ तर मार्च महिन्यात ३६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply