Amravati News : सलग ३ महिने महिलेवर अत्याचार; तव्यावर बसणाऱ्या भोंदूबाबाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Amravati News : तवेवाला बाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भोंदूबाबा विरोधात महिलेने बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. त्या प्रकरणी बलात्कारी बाबाला १८ दिवसानंतर पोलिसांनी अटक केली आहे. दोन दिवसांची पोलीस कोठडी भोंदूबाबाला सुनावण्यात आली आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, अमरावती जिल्ह्यातील मार्डी येथे ही घटना घडलीये. यामध्ये तवेवाला बाबा म्हणून नावारुपास आलेला गुरुदास बाबा उर्फ सुनील कावलकर याने आपल्या आश्रमातच मध्यप्रदेश येथील महिलेवर तीन महीने बलात्कार केला होता.

Asha Sevika Strike : संभाजीनगरमधील 440 आशा स्वयंसेविकांचं तडकाफडकी निलंबन; प्रशासनाचा खळबळजनक निर्णय

तसेच या नराधमाने घटनेच चित्रफीत सुद्धा केली होती. कुणाला सांगितले तर जीवे मारण्याची धमकी पीडित महिलेला त्याने दिली होती. आपल्या पतीची तब्बेत बरोबर नसते. पतीचा आजार बरा व्हावा यासाठी पीडिता या भोंदूबाबाकडे आली होती.

मात्र भोंदूबाबाने महिलेचा गैरफायदा घेतला. पिडीतेवर वारंवार अत्याचार केला. सततच्या त्रासाला कंटाळून पिडीतेने २५ जानेवारीला कुऱ्हा पोलीस स्टेशनमध्ये बाबावर अत्याचार केल्याची तक्रार दिली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा नोंदविला. गुन्हा दाखल होताच हा भोंदूबाबा फरार झाला होता.

पोलिसांनी भोपाळ येथील एका लॉजमधून भोंदूबाबाला अमरावती स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. सध्या या भोंदूबाबाला अमरावतीत आणण्यात आले असून पोलिसांना आपली ओळख पटूनये यासाठी भोंदूबाबाने आपला पूर्ण लूक बदलला होता. त्याने आपली दाढी व हेअर स्टाइल बदलली होती.

दरम्यान भोंदूबाबाला अटक केल्यानंतर त्याच्याकडून अजून काही पुरावे मिळतात का याचा तपास पोलीस करत आहेत. न्यायालयाने भोंदूबाबाला २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply