Amravati News : 'तलाठी भरती रद्द करा..' विद्यार्थ्यांचा अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा;

Amravati News :  गेल्या काही दिवसांपासून राज्यात तलाठी भरतीच्या निकालावरुन नवा वाद उभा राहिला आहे. राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या तलाठी भरती प्रक्रियेत मोठा गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. ही भरती प्रक्रिया रद्द करुन नव्याने पदभरती करण्यात यावी अशी मागणी विरोधकांकडून होताना दिसत आहे. याच मागणीसाठी अमरावतीमध्ये विद्यार्थी आक्रमक झाले असून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आहे.

तलाठी पदभरती पुन्हा घ्यावी तसेच टीसीएस आयबीपीएस या परीक्षा घेणाऱ्या कंपन्या बंद कराव्या या मागणीसाठी आज युवक दिनी विद्यार्थीवर्ग रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. अमरावतीमध्ये  स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी डॉ.अजय यावले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

MNS News : मनसेने भाकरी फिरवली; कल्याण शहर अध्यक्षपदी माजी आमदार प्रकाश भोईर यांची वर्णी

यावेळी तलाठी पदभरती रद्द करून नव्याने घ्या व पोलीस भरती तात्काळ काढा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. यावेळी मागण्याचे फलक विद्यार्थ्यांनी आक्रोश केला. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला तलाठी पदभरती  कॉंग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी पाठिंबा दर्शवत मोर्चामध्ये सहभाग घेतला.

यशोमती ठाकूर यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा...

दरम्यान, यावेळी बोलताना आमदार यशोमती ठाकूर यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. राष्ट्रीय युवक दिनी विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरावे लागत आहे. याबद्दल काय बोलणार? पंतप्रधान मोदींना  ते म्हणतील तेच खरे वाटते, त्यांना संविधानही खोटे वाटते.. असा टोला यशोमती ठाकूर यांनी लगावला.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply