Amravati News : २ हजार ५०० अंगणवाड्यांना लागले टाळे, काय आहेत अंगणवाडी सेविकांच्या मागण्या? जाणून घ्या

Amravati News  : अंगणवाडी सेविकांना २६ हजार आणि मदतनीसांना २० हजार रुपये मानधन द्या तसेच कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा यासह अन्य मागण्यांसाठी अमरावती जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी बेमुदत संप सुरू केला आहे. या संपात सुमारे ४ हजार सेविका-मदतनीस सहभागी झाल्या आहेत. यामुळे जिल्ह्यातील सुमारे २ हजार ५०० हजार अंगणवाड्यांना कुलूप लागले आहे.

Pune Cyber Fraud : पुण्यातील ऑनलाइन पेमेंट कंपनीला घातला ३.५ कोटींचा गंडा; २ सायबर चोरट्यांना पश्चिम बंगालमधून अटक

दरम्यान आज अंगनवाडी सेविकांनी आक्रमक भूमिका घेत एल्गार पुकारत अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या राज्य तसेच केंद्र शासनाकडे अनेक मागण्या प्रलंबित आहेत. याबाबर वारंवार  आंदोलने करण्यात आली. मात्र आश्वासनाशिवाय त्यांना काहीही मिळाले नाही त्यामुळे त्यांनी बेमुदत आंदोलन पुकारत मोर्चा काढला आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply