Amravati News : भारतीय सैन्य दलातील जवानाने संपविले जीवन; आजारी वडिलांना भेटण्यासाठी आले होते सुटीवर

Amravati News : अमरावती शहरातील भारतीय सैन्य दलात कार्यरत जवान वडील आजारी असल्याने त्यांना भेटण्यासाठी सुटी घेऊन घरी आले होते. मात्र त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना  अमरावती शहरात समोर आली आहे.

जवान विशाल विनोदराव चव्हाण असे आत्महत्या केलेल्या जवानांचे नाव आहे. मृत विशाल चव्हाण हे भारतीय सैन्य दलात नोकरीला असून त्यांचे वडील आजारी असल्यामुळे ते गेल्या दहा दिवसापासून ते सुट्टीवर अमरावती आले होते. दरम्यान वडिलांची भेट घेऊन त्यांनी गप्पा मारल्या. यानंतर त्यांनी अमरावती येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला. बातमी  नातेवाईकांना समजल्यानंतर मृतांच्या नातेवाईकांची अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

Buldhana News : मोबाईलवर बोलत भरधाव वेगात पळवली बस; चालकाचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ, बुलढाण्यातील संतापजनक प्रकार

विशाल चव्हाण यांचे वडील सुद्धा भारतीय सैन्य दलात नोकरीला होते. यामुळे घरात चांगले वातावरण होते. दरम्यान सुटीवर आलेल्या विशाल चव्हाण यांनी गळफास घेऊन आत्महत्या का केली? याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. पुढील तपास गाडगे नगर पोलीस करत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply