Amravati Crime News : भावी डॉक्टर तरुणीने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा; धक्कादायक घटनेनं अमरावतीत खळबळ

Amravati Crime News : वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या एका २३ वर्षीय तरुणीने राहत्या खोलीत गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही धक्कादायक घटना अमरावती शहरातील गुरुदेवनगर परिसरात घडली. संस्कृती महेंद्र वानखेडे (वय २३) असे मृतक युवतीचे नाव असून ती नांदेड जिल्ह्यातील रहिवासी आहे. या घटनेनं शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृत तरुणीचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. संस्कृतीने इतकं टोकाचं पाऊल नेमकं का उचललं? याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मूळनांदेड जिल्ह्यातील असलेली संस्कृतीने वैद्यकीय शिक्षणासाठी अमरावतीत आली होती.

Ravikant Tupkar : रविकांत तुपकरांनी विधानसभेला शड्डू ठोकला; बुलडाण्यातील सर्व जागा लढवण्याची केली घोषणा

गुरुदेवनगर येथील गुडघे यांच्याकडे ती किरायाने रुम घेऊन राहत होती. संस्कृतीने आपलं वैद्यकीय शिक्षण जिल्ह्यातील  गुरुकुंज मोझरी येथील श्री गुरुदेव आयुर्वेद महाविद्यालयातून पूर्ण केलं. सध्या संस्कृती ती वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून इंटर्नशिप करत होती.काही दिवसांतच तिला इंटर्नशिप पूर्ण केल्याचा दाखला देखील मिळणार होता. मात्र, त्याआधीच तिने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. दरम्यान, ही बाब खोली मालकाच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पंचनामा करून संस्कृती हिचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. तसेच तिच्या आत्महत्येबाबत कुटुंबियांना माहिती देण्यात आली आहे. भावी डॉक्टर तरुणीने अचानक आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply