Amravati Accident News : अमरावतीमध्ये ट्रकचा भीषण अपघात; वाहन चालकासह ६ जनावरांचा मृत्यू

Amravati Accident News : अमरावतीमधून अपघाताची एक मोठी घटना समोर आली आहे. जिल्ह्यतील दर्यापूर ते अकोला मार्गावरील गोळेगाव फाट्याजवळ अवैध जनावरे घेऊन जात असताना वाहनाचा अपघात झाला आहे. अपघात इतका भीषण होता की, यात वाहन चालकासह ६ जनावरांचा मृत्यू झाला आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, भरधाव वेगाने वाहन असल्याने रस्यातच टायर फुटला. मृतक चालकाला दर्यापूर येथे उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून पलटी वाहन जेसीबीच्या सहाय्याने रस्त्याच्या खाईतून बाहेर काढण्यात आले आहे. घटनास्थळी दर्यापूर पोलिसांचा बंदोबस्त दाखल झाला आहे.

Latur News : सहा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, संतप्त नागरिक उतरले रस्त्यावर; आज लातुर बंद

अपघातामुळे काही काळासाठी मुख्य रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत संपूर्ण वाहतूक सुरळीत केली आहे. दर्यापूर शहरातून दररोज सकाळी पाच वाजेच्या सुमारास अशाप्रकारे भरधाव वेगाने अवैध जनावरांचे वाहन अकोला येथे जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. जखमी जनावरांवर डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत.

आज पुण्यामध्येही अपघाताच्या मोठ्या घटना घडल्या आहेत. दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अरघातामध्ये ३ जण ठार झालेत. खडकवासला चौपाटीच्या पुढील बाजूला एमइएस कॅन्टीन बसथांबा परिसरात टेम्पोने दुचाकी व पायी चालणाऱ्याना धडक दिलीये. या घटनेत पायी चालणाऱ्या व्यक्ती आणि दुचाकी चालक यांचा मृत्यू झाला आहे. तसेच येवलेवाडीजवळ बोपदेव घाटात भरधाव मोटार उलटून एका तरुणाचा मृत्यू झालाय. तर अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.


विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *