Ambernath : अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीला मोठी आग; कामगार आणि नागरिकांची एकच पळापळ, 4 जण जखमी

Ambernath : अंबरनाथमध्ये एका रासायनिक कंपनीला आग लागल्याची घटना घडली आहे. अंबरनाथच्या वडोळ एमआयडीसीत रासायनिक कंपनीला ही आग लागली आहे. कंपनीला लागलेल्या आगीने मोठा पेट घेतला आहे. या आगीचे धुराचे लोट परिसरात पसरले आहे. आग लागल्याची माहिती कळताच अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथच्या वडोळ गाव एमआयडीसीत रासायनिक कंपनीला आज दुपारी मोठी आग लागली. ब्लु जेट हेल्थ केअर असं कंपनीचं नाव आहे.कंपनीतील एक रियाकटरचा स्फोट झाला. त्यानंतर कंपनीला मोठी आग लागली. अग्निशमन दल ,पोलीस,रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले आहे.

या आगीत चार जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. या आगीच्या धुराचे लोट कल्याण-बदलापूर राज्य महामार्गावर पसरले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *