Ambernath : टेम्पोच्या धडकेत नौदल निवृत्त अधिकाऱ्याचा मृत्यू, घटना सीसीटीव्हीत कैद; फरार आरोपी अटकेत

Ambernath : अंबरनाथमध्ये एका भीषण अपघाताची घटना घडली होती. एका भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने सायकलस्वार निवृ्त्त अधिकाऱ्याला उडवलं. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. हा अपघात घडल्यानंतर टेम्पो ड्रायव्हर फरार झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी करत फरार टेम्पोचालकाचा शोध घेत भिवंडीतून त्याला अटक केली आहे. तसेच टेम्पोही जप्त केला आहे.

अंबरनाथ पश्चिमेच्या लादी नाका परिसरातील अंबर केअर हॉस्पिटलसमोर एक भीषण अपघात घडला. १५ मार्च रोजी नौदलातून नुकतेच निवृत्त झालेले अधिकारी शिवप्रसाद गौड हे सायकलिंगसाठी घरातून निघाले होते. फॉरेस्ट नाक्याहून अंबर केअर हॉस्पिटलसमोर जात असताना त्यांच्या सायकलच्या मागे भरधाव वेगाने टेम्पो आली.

भरधाव टेम्पोने आधी त्यांच्या सायकलला जोरदार धडक दिली. त्यानंतर हॉस्पिटलच्या समोर उभ्या असलेल्या दोन रुग्णवाहिकांनाही या टेम्पोने धडक दिली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. अपघात घडल्यानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरून फरार झाला होता. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या शिवाप्रसाद गौड यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी फरार टेम्पोचालकाचा शोध घेत भिवंडीतून त्याला अटक केली. तसेच टेम्पोही जप्त केला आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply