Ambernath : अंबरनाथ पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे शहरात कचऱ्याचे ढीग, सफाई कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन

Ambernath : अंबरनाथ शहरातील कचरा व्यवस्थापनावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. पालिकेने ऑगस्ट महिन्यात शहरातील कचरा उचलण्याच्या जबाबदारीसाठी समीक्षा कंपनीची नेमणूक केली होती. मात्र, गेल्या सात महिन्यांपासून पालिकेने संबंधित कंपनीला बिलच दिलेले नाही. परिणामी, ठेकेदाराच्या आर्थिक गणितावर मोठा परिणाम झाला असून, कर्मचाऱ्यांचे वेतनही रखडले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सफाई कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नसल्याने त्यांनी शुक्रवारी सकाळी काम बंद आंदोलन पुकारले. घंटागाडी चालक आणि कर्मचाऱ्यांनी शहरातील कचरा उचलण्यास नकार दिल्याने अंबरनाथमध्ये कचऱ्याचे ढीग वाढू लागले आहेत. या परिस्थितीमुळे पालिका प्रशासनात खळबळ उडाली असून, अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन कर्मचाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

MSRTC ST Bus Attack : बस चालकाला मारहाण प्रकरण; महाराष्ट्र-कर्नाटक एसटी बस वाहतूक थांबवली,मारहाण प्रकरणानंतर ठाकरे गट आक्रमक

ठेकेदाराच्या म्हणण्यानुसार, एक-दोन महिन्यांचे बिल थकल्यास ते व्यवस्थापन करता येऊ शकते. मात्र, तब्बल सात महिन्यांचे बिल न मिळाल्याने कामगारांचे वेतन, वाहनांचा खर्च आणि इतर व्यवस्थापन कठीण झाले आहे. त्यामुळे परिस्थिती अधिक बिकट होत चालली आहे. पालिकेच्या या भोंगळ कारभारामुळे शहरातील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर झाला आहे.

कचरा वेळेवर न उचलल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, अंबरनाथ पालिकेने शहराच्या स्वच्छतेसाठी आवश्यक असलेल्या निधीच्या वितरणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे. स्वच्छ भारत अभियान आणि नागरी आरोग्य व्यवस्थापनाच्या दृष्टीने हा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे. पालिका प्रशासनाने तातडीने यावर तोडगा काढावा अन्यथा शहरातील आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची भीती नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे.

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply