Ambenali Ghat Landslide : आंबेनळी घाटातील मेटतळेनजीक दरड काेसळली; पोलादपूर-महाबळेश्वर रस्ता वाहतुकीस बंद

Poladpur Ghat : सततच्या पावसामुळे पोलादपूर- महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात दरड कोसळण्याचे प्रकार अद्यापही सुरूच आहे. आज (गुरुवार) पहाटेच्या सुमारास घाट मार्गात दरड काेसळल्याने दक्षता म्हणून प्रशासनाने घाटातील रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या दाेन दिवसांपासून सातारा आणि रायगड जिल्ह्यात पावसाचा चांगला जाेर आहे. पावसामुळे काही जिल्ह्यात दरडी काेसळण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली हाेती. दरम्यान मंगळवार रात्रीपासून आंबेनळी घाटात दरड कोसळण्याच्या घटना समाेर आल्या. त्याचा परिणाम पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील वाहतूकीवर झाला. या घाटातील वाहतूक पूर्ववत झाल्यानंतर पुन्हा दरड कोसळण्याचा प्रकार झाला. परंतु त्याचा वाहतुकीवर फारसा परिणाम झाला नाही.

Narhari Zirwal : 16 आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयाची ठाकरे गटाला लागली गडबड, झिरवाळांना निवेदन

दरम्यान आज (गुरुवार) पहाटे पोलादपुर- महाबळेश्वर मार्गावर पुन्हा दरड कोसळली. सातारा  जिल्ह्यातील मेटतळे धबधब्या जवळ दरड कोसळली. आर्धा रस्ता खुला असला तरी दक्षतेचा इशारा म्हणुन मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. बुधवारी तीन वेळा आंबेनळी घाटात तर गुरुवारी पहाटे सातारा हद्दीत दरड कोसळल्याने तसेच पावसाचा जोर कायम असल्याने प्रशासन अलर्ट झाले आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply