Ambenali Ghat : आंबेनळी घाट 15 दिवस वाहतुकीसाठी बंद : जिल्हाधिका-यांचा आदेश

Raigad News : पोलादपूर - महाबळेश्वर (आंबेनळी घाट) रस्ता सर्व प्रकारच्या वाहतूकीकरीता पुढील १५ दिवसांकरीता बंद करण्यात आलेला आहे. त्याबाबतचा आदेश रायगड जिल्हाधिका-यांनी काढला आहे. 

रायगड आणि सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावासाची संततधार सुरु हाेती. आज (शनिवार) दाेन्ही जिल्ह्यांत पावसाने उसंत घेतली आहे. गेल्या आठवडाभर पावसामुळे सातारा जिल्ह्यात तसेच रायगड जिल्ह्यात घाट रस्त्यांवर दरडी काेसळण्याच्या घटना झाल्या. विशेषत: पोलादपूर - महाबळेश्वरच्या आंबेनळी घाट रस्त्यात दरडी पडल्याने वाहतुकीस अडचणी निर्माण झाल्या.

Indian Navy : समुद्रात भरकटले ३६ जण असलेले तीन जहाज, भारतीय नौदल आले मदतीला धावून

दरम्यान पोलादपूर - महाबळेश्वर (आंबेनळी घाट) रस्ता हा सद्य:स्थितीत सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वाहतुकीकरीता पुढील १५ दिवस पुर्ण बंद करण्याबाबतचा निर्णय जिल्हाधिका-यांनी घेतला. त्यानूसार हा घाट रस्ता सर्व प्रकारच्या वाहतूकीकरीता पुढील १५ दिवसांकरीता बंद करण्यात येत असल्याचे अपर जिल्हादंडाधिकारी रायगड- अलिबाग संदेश शिर्के यांनी कळविले आहे.

दरम्यान पाऊस, भुस्खलन, दरड कोसळणे या परिस्थितीबाबत वाहतुकीचा दर १५ दिवसांनी सविस्तर आढावा घेऊन हा घाट रस्ता बंद ठेवण्याच्या अनुषंगाने स्वयंस्पष्ट अहवाल दर १५ दिवसांनी पोलिस अधीक्षक कार्यालय, रायगड अलिबाग व उपविभागीय अधिकारी महाड यांनी सादर करावा.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply