Ambedkar Jayanti 2023: मुंबईतील 'या' भागात अशोक स्थंभ दिमाखात उभा राहणार; १३ एप्रिलला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण

CM Eknath shinde : सार्वभौम आणि अखंड भारताचे राष्ट्रीय चिन्ह असणारा अशोक स्तंभ ही पूर्व उपनगरातील चेंबूरची नवी ओळख ठरणार आहे. चेंबूरच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोर उभारण्यात येणाऱ्या अशोक स्तंभाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू होत आहे. लवकरच अनेक वर्षांपासून रखडलेला अशोक स्तंभ दिमाखात उभा राहणार राहणार आहे. 

शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांच्या पाठपुराव्यामुळे सुमारे तेरा वर्षे प्रलंबित असलेल्या चेंबूरमधील या अशोक स्तंभाच्या उभारणीच्या कामाला सुरुवात झाली असून खासदार शेवाळे यांच्या खासदार निधीतून हा स्तंभ उभारला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्या हस्ते १३ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता या अशोक स्तंभाचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

देशभरातील आंबेडकरी अनुयायांचे प्रेरणास्थान असलेल्या दादरच्या चैत्यभूमी येथे उभारण्यात आलेल्या अशोक स्तंभाप्रमाणे, चेंबूरच्या डॉ. आंबेडकर उद्यान समोर देखील अशोक स्तंभ उभारावा, अशी स्थानिकांची आणि आंबेडकरी अनुयायांची मागणी होती.

यानुसार सुमारे २००८ साली याठिकाणी अशोक स्तंभ उभारणीच्या कामाला सुरुवात झाली. मात्र, काही कारणास्तव मागील १३ वर्षे हे काम रखडले. खासदार राहुल शेवाळे यांनी सरकारी यंत्रणांकडे पाठपुरावा करून अखेर हे काम पूर्णत्वास नेले.

भारत सरकारने अशोक स्तंभाचा स्वीकार केव्हा केला?

अशोक स्तंभाला भारत सरकारने १९५० साली राष्ट्रीय चिन्ह म्हणून स्वीकारले. अशोक स्तंभ हे संस्कृती आणि शांतीचं प्रतिक म्हणून मानलं जातं. अशोक स्तंभ प्रतिकामध्ये चार सिंह आहेत. या चार सिंहाचं कनेक्शन भगवान गौतम बुद्धांशी आहे. अशोक स्तंभाच्या खाली सत्यमेव जयते लिहिलं जाते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply