Ambadas Danve : छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया, म्हणाले...

Ambadas Danve : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी १७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुरू झालेल्या नाराजीच्या चर्चेला दानवे यांनी पूर्णविराम दिला. मी नाराज नाही. पक्षाचं हित मला कळलं, असं म्हणत अंबादास दानवे यांनी म्हटलं.

Ram Satpute : प्रणिती शिंदे मला विजयाचं पत्र सुद्धा लिहितील; अभिनंदनाच्या पत्रावर राम सातपुतेंचं प्रत्युत्तर

सर्वांची मते जाणून घेऊन ही यादी करण्यात आली आहे. ही प्रभावी यादी आहे. दिल्लीत जाण्याची ही यादी आहे. मी 2014, 2019 मध्ये इच्छुक होतो तशी आताही इच्छा होती. इच्छा असणे चूक नाही. मात्र माझ्याकडे विरोधी पक्षनेतेपदाची महत्वाची जबाबदारी दिली आहे. आम्हाला हट्ट करण्याचा अधिकार आहे. निर्णय घेण्याचा अधिकार पक्षप्रमुखांचा आहे, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं. 

व्यक्तिगत हितापेक्षा संघटनेचे हीत महत्वाचं आहे. पक्षप्रमुख आणि पक्ष जी जबाबदारी देतील ती सर्व जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार आहे. मी पक्षप्रमुखांना आता फोन करून बोललो, तुम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे. चिंता नसावी जोमाने पक्षाचं काम करू म्हटलं, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply