Amaravati : दुचाकी– कारचा भीषण अपघात; अपघातात वडिलांचा जागीच मृत्यू, मुलगा गंभीर

अमरावती : चांदुर रेल्वे वर्धा रोडवर आज दुपारी दुचाकी व कारचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात दुचाकीवरून जात असलेल्‍या वडीलांचा जागीच मृत्‍यू झाला. तर मुलगा गंभीर जखमी आहे. 

चांदुर रेल्‍वे वर्धा रोडवर हा भीषण अपघात झाला. चांदुर रेल्वे येथून प्रभाकर तायडे व त्यांचा मुलगा अमोल तायडे हे दुचाकीने वर्धा येथे जात होते. याच वेळी समोरून भरधाव वेगाने येत असलेल्‍या कारने दुचाकीचा जोरदार धडक दिली. राजना फाट्यावर झालेल्‍या या भीषण अपघातात बापलेक रस्‍त्‍यावर फेकले गेले. यात डोक्‍याला मार लागल्‍याने प्रभाकर तायडे यांचा जागीच मृत्यू झाला.

सदरच्‍या अपघातात वडीलांचा मृत्‍यू झाला असून, त्‍यांच्‍यासोबत असलेल्‍या त्‍यांचा मुलगा अमोल तायडे हा गंभीर जखमी झाला आहे. अमोल याला तातडीने प्राथमिक उपचारासाठी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *