
Altaf Pevekar Attacks : शिवसेना शिंदे गटाचे अंधेरी विभाग प्रमुख अल्ताफ पेवकर यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोमवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास हा हल्ला झाला असल्याचे समजते.
अल्ताफ पेवकर वर्सोवा येथून आपल्या कारने घरी निघाले असता, हल्लेखोर तोंडाला रूमाल बांधून आले आणि त्यांनी अचानक हल्ला चढवला. हल्लेखोरांनी बॅटच्या सहाय्याने अल्ताफ पेवकर यांच्या कारची काच फोडली. तसेच त्यांना मारहाण देखील केल्याची माहिती आहे.
या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा हल्ला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचा आरोप अल्ताफ पेवकर यांनी केला आहे. दरम्यान, अल्ताफ पेवकर यांच्यावर हल्ला झाल्याचं कळताच शिंदे गटाच्या कार्यकर्ते वर्सोवा पोलीस ठाण्याबाहेर जमले होते.
|
|
आरोपींवर तातडीने गुन्हा दाखल करत त्यांना अटक करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण पसरलं होतं.
याबाबत मिळालेली माहिती अशी, शिवसेना शिंदे गटाचे अंधेरी आणि वर्सोवा विधानसभा क्षेत्राचे विभाग प्रमुख अल्ताफ पेवकर सोमवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास आपल्या कारने घरी जाण्यासाठी निघाले होते.
अंधेरी पश्चिमेकडील मॉडेल टाउन परिसरात त्यांची कार आली असता, अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. हल्लेखोरांनी हातात असलेल्या बॅट आणि हॉकीस्टिकने अल्ताफ यांच्या कारची काच फोडली. हल्लेखोरांनी तोंडाला रूमाल बांधला असल्याने त्यांना ओळखता आलं नाही.
दरम्यान, अज्ञातांकडून हा हल्ला झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे अनेक कार्यकर्ते रात्री उशिरा वर्सोवा पोलीस ठाण्याबाहेर देखील जमले होते. मात्र, हा हल्ला कोणी केला? राजकीय वर्चस्व वादातून हा हल्ला झाला का? याबाबत सध्या पोलीस तपास करत आहेत.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

