Alibaug News : फिरायला गेला अन् काळाने घाला घातला; अलिबागच्या समुद्रात बुडून पुण्यातील तरुणाचा मृत्यू

Alibaug News : अलिबागच्या समुद्रात पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मित्रांसोबत फिरायला गेला असताना ही घटना घडली आहे. गुरुवारी १३ जून रोजी दुपारी ही घटना घडली आहे. हा तरुण समुद्रात पोहण्यासाठी गेला होता. पोहण्यासाठी गेला असताना त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.

अविनाश शिंदे असं मृत तरुणाचे नाव आहो. अविनाश हा मूळचा औरंगाबाद येथील रहिवासी आहे. अविनाश पुणे जिल्ह्यातील आळंदी येथून मित्रांसोबत अलिबाला गेला होता. तिथे समुद्रकिनारी आल्यानंतर अविनाश एकटात पोहण्यासाठी पाण्यात उतरला. समुद्र त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. समुद्रातून तो त्याच्या मित्रांना हात करत होता. मात्र, काही वेळातच तो दिसेनासा झाला. त्यावेळी जीवरक्षकांनी लगेचच पाण्यात उडी घेतली. परंतु जीवरक्षक तरुणाला वाचवण्यात अयशस्वी ठरले. जीवरक्षक आणि पोलिसांनी अविनाशला शोधण्याचा प्रयत्न केला असता कोर्टाच्या मागील बाजूल किनाऱ्यावर त्याचा मृतदेह सापडला. अविनाशच्या अचानक जाण्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

ED Raid : मुंबई, पुण्यात १९ ठिकाणी ईडीचे छापे, लोकसभा निवडणूक निकालांशी कनेक्शन

मिळालेल्या माहितीनुसार, अविनाश आळंदी येथे एका कंपनीत काम करत होता. त्याचे चार मित्रदेखील त्याच कंपनीत काम करत होते. पावसाळ्यात सुट्ट्य एन्जॉय करण्यासाठी हे मित्र अलिबागला गेले होते. अविनाशच्या नातेवाईकांना घडलेल्या घटनेची माहिती देण्यात आली आहे. पावसाळ्यात समुद्राला सतत भरती येत असते. त्यामुळे पावसाळ्यात समुद्रात पोहण्यासाठी जाण्याचे धाडस करु नका. त्यामुळे तुम्ही जीव गमावू शकता, असे सांगण्यात येत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply