Akola Politics : अकोल्यात बच्चू कडू यांना मोठा धक्का, प्रहारच्या शहराध्यक्ष सागर उकंडे यांचा राजीनामा; नेमकं कारण काय?

Akola Politics : अकोला जिल्ह्यात प्रहार जनशक्ती पक्षाला मोठा धक्का बसलाय. जिल्ह्यातील अकोट शहरात प्रहार पक्षात राजीनाम्यांचं सत्र सुरुच आहे. या शहरातील बऱ्याच प्रमुख पाधिकाऱ्यांनी आपापल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. पक्षातील अंतर्गत डावपेच, कलह, गटबाजी, वरिष्ठ पदाधीकाऱ्यांची मनमानी व प्रोटोकॉलचे उल्लंघन करणे या कारणांमूळ हे राजीनामे दिल्या जात आहेत, असं सूत्रांचं म्हणणं आहे.

आता पुन्हा अकोट शहराध्यक्ष सागर उर्फ त्र्यंबक आप्पा उकंडे यांनी आपला पदाचा राजीनामा दिलाय. उकंडे हे प्रहार पक्षातील जूने पदाधिकारी असून त्यांनी अकोट तालुक्यातील अपंगांसाठी तसेच रस्त्याच्या विकास कामांसाठी प्रचंड आंदोलन त्यांनी केले आहेत. ज्यामुळे ते नेहमीच चर्चेतही राहिले आहेत. 

Pune Crime News : जेवणात त्रुटी काढल्याने पत्नी संतापली; कांदा कापण्याच्या चाकूने पतीला भोसकलं, पुण्यातील घटना

का दिला राजीनामा?

राजीनामा पत्रात त्यांनी पुढे म्हटल आहे की, मागील २ वर्षापासून प्रहार पक्षात स्थानिक पातळीवर अंतर्गत डावपेच, कलह निर्माण होत आहेत. गटबाजी, वरिष्ठ पदाधीकारी यांची मनमानी व प्रोटोकॉलचे उल्लंघन करणे, अशा विविध गोष्टींसाठी सध्या पक्षात काम करणे कठीण झाले आहे. सध्याचा अकोट शहरातील प्रहार पक्ष हा बच्चू कडू यांच्या विचारांच्या विरुद्ध दिशेने स्थानिक पदाधिकारी नेत आहे. त्यामुळे आपण त्यांच्या विचाराची पायमल्ली होत असतानां शांत बसने उचित वाटत नाही. म्हणून अकोट शहर अध्यक्ष पदाचा तसेच पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे ते म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply