Akola Crime News : संतापजनक! ११ वर्षीय मुलीवर अत्याचार, सिगारेटचे चटके देत केसही कापले; काळीमा फासणारी घटना

Akola Crime News : अकोला शहरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. ११ वर्षीय शाळकरी मुलीवर घराशेजारी राहणाऱ्या एका नराधम तरुणाने चाकूचा धाव दाखवून वारंवार अत्याचार केला. शहरातील कैलास टेकडी परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

या घटनेनं परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे. प्राप्त माहितीनुसार, ११ वर्षीय पीडित मुलगी कैलास टेकडी    परिसरात राहते. पीडितेचे वडील मोलमजुरी करतात. एकेदिवशी पीडितेच्या घरी कुणी नसल्याचा फायदा घेत आरोपी तिच्या घरामध्ये शिरला. चाकूचा धाक दाखवून त्याने पीडितेवर अत्याचार केला.

Dhangar Reservation : इंदापूर शहरात कडकडीत बंद; बारामतीत उपाेषणकर्त्या धनगर बांधवांच्या भेटीला विजय वडेट्टीवार

याबाबत कुणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. या प्रकारानंतर पीडिता घाबरली तिने याची वाच्यता कुणाकडे केली नाही. याच गोष्टीचा फायदा घेत आरोपीने पीडितेचं वारंवार लैगिंक शोषण केलं. इतकचं नाही, तर आरोपीने पीडितेला सिगारेटचे चटकेही दिली.

आरोपीने कात्रीच्या सहाय्याने पीडितेचे केस देखील कापले. दिवसेंदिवस आरोपीचं कृत्य वाढत असल्याने पीडितेने या प्रकाराची माहिती आई-वडिलांना दिली. मुलीवर बलात्कार झाल्याचं कळताच आई वडिलांनी तातडीने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी नराधम आरोपीविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या देखील आवळल्या आहेत. या घटनेनंतर वंचित बहुजनक आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी खदान पोलिसांकडे केली. या संपूर्ण प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली असून अनेकांनी यावर संताप व्यक्त केला जात आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply