Akola Crime : पोलिसांच्या मारहाणीत संशयित आरोपीचा मृत्यू; पीएसआयसह ३ पोलिस कर्मचाऱ्यांवर खुनाचे गुन्हे दाखल

Akola Crime :  पोलिसांनी मारहाण करण्यात संशयित आरोपीचा मृत्यू झाला होता. गोवर्धन हरमकार असं मृतक संशयित आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे त्याला पोलिसांकडून अमानुषपणे मारहाण झाली. त्याच्या गुदद्वारात दांडा टाकून अमानुषपणे कृत्य केलंय. या मारहाणीत त्याच्या छातीची हाडं तुटले होते. त्यानंतर पोलिसांनी त्याला एका ऑटो रिक्षा चालकाला बोलावत खाजगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा दुसऱ्याच दिवशी मृत्यू झाला. एवढ्या गंभीर प्रकरणात अकोला पोलिसांकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नव्हती. दरम्यान मृतकाच्या कुटुंबियांनी विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय गाठलं. यानंतर चौकशी समिती बसली. या प्रकरणात मृतकाच्या वैद्यकीय अहवालानुसार खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात पोलीस उपनिरीक्षक राजेश जवरे, पोलीस कॉन्स्टेबल चंद्रप्रकाश सोळंके या दोघांनाही ताब्यात घेतल.

Jalgaon Fire News : जळगावमध्ये अग्नितांडव! केमिकल कंपनीला भीषण आग, 4 जण अडकल्याची भीती

कुटुंबियांनी काय म्हटलेय तक्रारीत?
मृत गोवर्धन यांचे काका सुखदेव हरमकार यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले होते की, एका गुन्ह्याच्या आरोपाखाली अकोट शहर पोलिसांतील पीएसआय राजेश जवरे आणि इतर ३ पोलीस कर्मचाऱ्यांनी १५ जानेवारीला पूतण्या गोवर्धन याला अटक केली. त्यानंतर १६ जानेवारीला सुकळी गावात आणत घर झड़ती घेतली. पुढे पोलिसांनी गोवर्धनसह तक्रारदार सुखदेव यांनाही ताब्यात घेतलं. १६ जानेवारीला रात्री आठ ते नऊ वाजता दोघांनाही पोलीस ठाण्यात आणण्यात आले. इथं दोघांनाही अमानुषपणे मारहाण सुरू झाली. या मारहाणीत सुखदेव हरमकार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने दोघांना रुग्णालयात दाखल केले. गंभीर अवस्था झालेल्या गोवर्धनला बाहेरील आकाश नामक व्यक्तीच्या मदतीनं पोलिसांनी खाजगी रुग्णालयात दाखल केले. दुसऱ्या दिवशी म्हणजे १७ जानेवारीला गोवर्धनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गोवर्धनच्या प्राथमिक एक्स-रे आणि मेडिकल कागदपत्राद्वारे दिसून आले की त्याच्या छातीची हाडं तूटली होती, असा आरोपही नातेवाईकांनी आपल्या तक्रारीत केलाय.

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply