Akola Accident : अकोल्यात डिझेल टँकर पलटी; डिझेल भरण्यासाठी लोकांची गर्दी

Akola : अकोल्यातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावर डिझलचा टँकर पलटी झाला. यामुळे टँकरमधून डिझेलची गळती होत असून गावात डिझेलचा टँकर पलटी झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. यामुळे महामार्गालगत असलेल्या गावकऱ्यांनी टँकरकडे येत डिझेलच्या कॅन भरून नेण्यासाठी गर्दी करत आहेत. 

अकोला अमरावती महामार्गावर डिझेलने भरलेला टँकर आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास पलटी झाला. महामार्गावर डिझेलचा टँकर पलटी झाल्याची माहिती काही क्षणातच गावभर पसरली. यानंतर गावकऱ्यांनी जमेल ते भांडे हातात घेऊन टँकरकडे धाव घेतली. पाण्याचा टँकर आल्यानंतर जी लगबग राहते. तशीच लगबग डिझेल जमा करण्यासाठी सुरु होती. बोरगांव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि लोकांना बाजूला करण्याचा प्रयत्न करीत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतेही जीवितहानी झाली नाही.

Pune Rain: खडकवासला 65 टक्क्यापर्यंत खाली करा, अजितदादांचा थेट अधिकाऱ्याला फोन

टँकरमधून डिझेल गळती होत असल्याने ते भरण्यासाठी कोणी प्लास्टिकची बकेट घेतली, तर कोणी ५ ते १० लिटरच्या कॅन हातात घेत टँकरकडे धाव घेतली. जमेल तेवढे डिझेल गोळा करायची धावपळ सुरु झाली. हा संपूर्ण प्रकार आहे अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा गावालगतचा घडला आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply