Akola Accident : कामावरून घरी जाताना काळाचा घाला; रस्ते अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

Akola Accident : अकोल्यातून अपघाताची मोठी घटना समोर आली आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर पातूर रस्त्यावर अपघात झाला आहे. या तिहेरी अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. बाळापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. या अपघाताने घटनास्थळी एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यात तिहेरी अपघात झालाय. अकोला जिल्ह्यातील बाळापूर पातूर रस्त्यावरील वाडेगावजवळ झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

Akola Crime : धक्कादायक! शाळकरी मुलांना चॉकलेच्या रॅपरमधून दिली जातेय भांग; अकोल्यातील संतापजनक घटना

बाळापुरात राहणारे सर्वजण दुचाकीवरून दररोजचं काम संपवून बाळापूरकड़ जात होते. अकोल्यात बाळापूर पातूर रस्त्यावर आल्यानंतर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातानंतर दोन्ही दुचाकीस्वारासहित सर्व जण खाली कोसळले. त्यानंतर पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने तिघांना चिरडले.

या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तिघांना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आलं आहे. ही अपघाताची घटना आज सोमवारी रात्री साडेसात वाजताच्या सुमारास घडली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply