Akola : १० दिवसाआड पाणी, ठाकरेंची शिवसेना आक्रमक, सरकारी कार्यालयात तोडफोड, खुर्च्या फेकल्या अन्..

Akola News Update : पाण्यासाठी अकोल्यात ठाकरे गट आक्रमक झाला आहे. चक्क अकोल्याच्या महापालिका कार्यलयातील पाणी पुरवठा कार्यलयातील कार्यकारी अभियंता कक्षात तोडफोड केलीये. अर्थातचं कार्यालयातील खुर्च्या फेकफाक केल्यात. आज सकाळी साडेअकरा वाजता सुमारास ठाकरे गटाने अकोला महापालिकेत हे आंदोलन केल आहे. पाणीपुरवठा अधिकारी कक्षात हजर नसल्याने चक्क ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयातील खुर्च्या तसेच इतर काही वस्तूंची तोडफोड अन् फेकाफेकी केली. त्याशिवाय महिलांनीदेखील सोबत आणलेले घागर फोडले.

दरम्यान, अकोला शहरातील मलकापूर भागात मागील काही दिवसांपासून १० दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. अनेकांना पैसे मोजत पाणी विकत आणावे लागते. तर काही स्थानिक नागरिक वर्गणी करत पाण्याचा टँकर बोलवत आहेत. त्यामुळे मलकापूर भागात पाण्याची भीषण जाणवू लागली होती. याच विरोधात आज संतप्त मलकापूर नागरिकांसह ठाकरे गटाने आज अकोला महापालिका कार्यालयात घागर मोर्चा काढलाय..

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मंगेश काळे यांच्या नेतृत्वात हा घागर मोर्चा निघाला होता. ठाकरेंच्या शिवसेनेने स्थानिक महिलांनी सोबत घेत घागर अर्थातच पाण्याचे मटके डोक्यावर घेत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात धडक दिली होती. पाणीपुरवठा अधिकारी अमोल डोईफोडे यांच्या कक्षात आंदोलन कर्ते दाखल झाले असते. यादरम्यान अमोल डोईफोडे हे कक्षात अनुपस्थित होते. त्यामुळ ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला होता आणि थेट कक्षातील अर्थातच कार्यालयातील खुर्च्या फेकल्या. तसंच संतप्त कार्यकर्त्यांनी त्यासोबतच महिलांनी सोबत आणलेले घागर देखील कार्यालयात फोडले आहेत. ठाकरे गटाच्या आक्रमक भूमिकेनंतर कार्यालयात एकच धावपळ उडाली होती.. आंदोलनाची माहिती मिळतात सिटी कोतवाली पोलीस देखील महापालिकेत दाखल झाली.

सद्यस्थितीत पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन शांत झालं. पाणीपुरवठा अधिकारी आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसापासून अकोल्यात दूषित पाणीपुरवठा त्यासोबतच अकोला शहराला होणारा पाणीपुरवठा आक्रमक होताना दिसून येत आहे. दरम्यान एकंदरीतच आता मलकापूर भागातील पाणी प्रश्न चांगलाच पेटला आहे.. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात पाणी द्या, पाणी द्या, अशा महिलांच्या जोरदार घोषणा सुरु होत्या. पाणी द्या, अन्यथा पाणी बिल रद्द करा, महिलांच्या अशा जोरदार घोषणा यादरम्यान पाहायला मिळाल्या.

अकोला शहराला पाचव्या दिवशी होणार पाणी पुरवठा

आजच्या स्थितीत अकोल्यातल्या काटेपूर्णा प्रकल्पात 24 दलघमीपेक्षा कमी जलसाठा शिल्लक राहिलाय. अकोला शहराचे तापमान वाढत आहे. 44 अंश सेल्सिअस एवढ्या या मोसमातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. त्यामुळे प्रकल्पातील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे. त्यामुळे दर दोन दिवसाआड एक टक्का जलसाठा घटत आहे. त्यामुळे उन्हाळ्याचे पुढील दोन महिने लक्षात घेता महापालिकेने आतापासूनच पाणी वापराचे काटकसरीचे धोरण अवलंबले आहे. त्यासाठी येत्या अकोला शहराला चौथ्या आणि पाचव्या दिवशी पाणी मिळणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल डोईफोडे यांनी दिली होती.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply