Food Poisoning : गुळपट्टी खाण्यातून दिंडीतील भाविकांना विषबाधा; शेगाव येथून परतल्यानंतर झाला त्रास

Akola : अनेक भाविक हे शेगाव येथे पायी दिंडी घेऊन दर्शनासाठी जात असतात. त्यानुसार अकोला जिल्ह्यातील हिंगणा नळकांडे येथील काहीजण पायदळ वारी करत शेगावला गेले होते. दर्शन घेऊन परत येत असताना रस्त्यात गुळपट्टी खाल्ली. यानंतर ३० ते ३५ जणांना उलट्या व मळमळचा त्रास जाणवू लागला होता. गुळपट्टी खाण्यातून विषबाधा झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील हिंगणा नळकांडे गावातून शेगाव येथे श्री संत गजानन महाराजांचे दर्शनासाठी पायदळ दिंडी वारी निघाली होती. शेगाव येथे गजानन महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर दिंडी वारी पुन्हा आपल्या परतीच्या प्रवासाला शेगावरून रवाना झाले. हिंगणा गावाकडे पायीच येत असताना वाटेत थोडा आराम करत दिंडी जात असताना वाटेतच काही दिंडीतील वारकऱ्यांनी एका ठिकाणी गुळपट्टीचा आस्वाद घेतला.

Pune Metro : पुणे मेट्रोचा आणखी विस्तार होणार, 7 मार्ग आणि ५५ स्टेशन, वाहतूककोंडीला ब्रेक लागणार!

आरोग्य पथक गावात दाखल

या दरम्यान दिंडीतील ३० ते ३५ जणांनी गुळपट्टी खाल्ली तर पाणी देखील प्यायले. त्यामुळे या सर्वाना मळमळ आणि उलट्या होऊ लागल्या असा प्राथमिक अंदाज लावला जातोय. तर काल रात्री उशिरा मळमळ आणि उलट्या होऊ लागल्याने विषबाधा झाल्याचे लक्षात आले. याबाबत आरोग्य यंत्रणेला माहिती मिळाल्यानंतर तातडीने बाळापूर येथील आरोग्य पथकाने हिंगणा गावात हजेरी लावली. येथील ग्रामस्थांवर प्राथमिक उपचार करत काहींना सलाईन देखील लावण्यात आल्या होत्या.

सर्वांची प्रकृती स्थिर

आरोग्य यंत्रणा गावात दाखल झाले असून सर्वांवर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. सद्यस्थितीत विषबाधा झालेल्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. तर जवळपास दहा ते पंधरा जणांवर अद्यापही बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. गुळपट्टी खाण्यातून विषबाधा झाल्या असल्याचे बोलले जाते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply