Akola : अकोल्यात ट्विस्ट, भाजपच्या बंडखोर उमेदवाराला वंचितचा बिनशर्त पाठिंबा

Akola : राजकीय क्षेत्रातील मोठी आणि अतिशय महत्वाची बातमी अकोल्यातून समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीची धामधूम आता जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात जोर धरू लागली असून प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. अकोल्यातल्या अकोला पश्चिम विधानसभा मतदार संघात वंचितने आपला पाठींबा जाहीर केला आहे. भाजपाचे बंडखोर उमेदवार हरीश अलीमचंदानी यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. अकोला पश्चिम मतदार संघात वंचितचे अधिकृत उमेदवार डॉ. जिशान हुसेन यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. त्यामुळे वंचितचा अकोला पश्चिममध्ये उमेदवार नाही आहे.

दरम्यान, जिशान हुसेन यांनी वंचित बहुजन आघाडीचा विश्वासघात केला आहे आणि आंबेडकर चळवळीचे राजकारण संपण्याचा काँग्रेसचा हा डाव असल्याचा आरोप वंचितने पत्रकार परिषदेतून केला आहे. या मतदारसंघात वंचितचा उमेदवार नसल्याने भाजपातून बंडखोरी केलेले अपक्ष उमेदवार हरीश अलीमचंदानी यांना वंचितने पाठींबा जाहीर केला आहे. अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत पाठिंबा संदर्भात घोषणा करण्यात आली.

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर भल्या पहाटे अपघात, कारने घेतला पेट, महिलेचा मृत्यू, २ जण गंभीर

याच मतदारसंघात वंचितचा २० हजारांवर मतांचा गठ्ठा आहे, हा गठ्ठा भाजपाचे बंडखोर उमेदवार अलीमचंदानी यांच्याकडं वळण्याची शक्यता आहे. वंचितने दिलेल्या पाठींबा भाजपाचे उमेदवार विजय अग्रवाल यांना धक्कादायक ठरणार का? हे पाहणं महत्वाचं असणार.अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात ३ लाख ५० हजार ७२५ मतदार आहेत. गेल्या तीस वर्षांत अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. मात्र, या मतदारसंघात भाजपला कधीच धक्का बसला नाही. अकोला पश्चिम मतदारसंघासाठी भाजपचे माजी नगरसेवक हरीश अलीमचंदानी, भाजपचे नेते अशोक ओळंबे, माजी महापौर अश्विन हातवळणे यांच्यासह २५ जण इच्छुक होते. मात्र भाजपने सर्वांना तिकीट नाकारत विजय अग्रवाल यांना संधी दिली. त्यामुळे भाजपचे नाराज हरीश अलीमचंदानी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत पक्षाला सोडचिट्टी दिली.

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply