Akkalkuwa News : आदिवासी पाड्यावरील घराला आग; गायीचे वासरू, शेळ्यांचा होरपळून मृत्यू

Akkalkuwa News : वाढलेल्या उन्हात आग लागल्याच्या घटना घडत आहेत. अशीच एक घटना अककलकुवा तालुक्यातील उमटीच्या पाटीलपाडा गावात घडली असून दुपारच्या सुमारास घराला अचानक आग लागुन घर जळून खाक झाले. या आगीत एक गायीचे वासरू व शेळ्यांचा होरपळून मृत्यू झाला आहे. 

नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भाग असलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील पाटीलपाडा गावात दुपारच्या सुमारास आग लागली. घरमालक मिलींद गिंबा वळवी हे बाहेरगावी गेले होते. तर त्यांची पत्नी सुनिता मिलिंद वळवी ह्या कैरीचे आमसुल तयार करण्यासाठी बाहेर गेलेल्या होत्या व तीघे मुले बाहेर खेळत होते. याच दरम्यान घराला अचानक आग लागली. मात्र आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. भर दुपारची वेळ व हवेमुळे संपुर्ण घर जळुन खाक झालेलं आहे.

संसारोपयोगी साहित्य जाळून खाक 

आग लागली यावेळी यासोबतच घरात बाधलेली गाय, गायीचे वासरू, शेळी, कोंबड्या भाजल्याने गायीचे वासरू आणि शेळी यांचा जळून मृत्यु झाला आहे. तर घरात बांधलेल्या गाय देखील ८० टक्के भाजली असुन गायीचे दोघे डोळे जळाले आहे. तसेच घरातील जीवनावश्यक व संसारोपयोगी वस्तूसह २१ हजार रुपये रोख जळाल्याने आदिवासी कुटंबाचे मोठे नुकसान झाले.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply