Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांच्या विमान अपघाताचा नवा व्हिडीओ समोर; शेवटच्या 5 सेकंदात काय घडलं?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारीला बारामती जवळ एका विमान अपघातात निधन झाले. अजित पवारांच्या अपघाती निधनाने सर्वांनाच धक्का बसला. त्यांच्या निधनानंतर अनेकांना हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यामुळे चर्चांना उधाण आले होते. आता या विमान अपघाताचा नवीन आणि अत्यंत स्पष्ट दिसणारा व्हिडीओ समोर आला आहे. आमदार रोहित पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन या अपघाताचा नवा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

नव्या व्हिडीओत काय?

रोहित पवार यांनी शेअर केलेल्या नव्या व्हिडीओत बारामती विमानतळाची धावपट्टी स्पष्ट दिसत आहे. या व्हिडीओत अजित पवार यांचे विमान लँडिंगसाठी येत असताना अचानक नियंत्रणाबाहेर गेल्याचे दिसत आहे. त्यामुळे हे विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी बाजूला कोसळले. त्यानंतर मोठा स्फोट झाला. यावेळी विमानाने पेट घेतला आणि त्यानंतर लगेचच आगीच्या ज्वाला भडकल्या. हे सर्व दृश्य एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

या व्हिडीओत विमानाचा स्फोट कसा झाला, ते कसं कोसळलं हे सर्व पाहायला मिळत आहे. तिथे बारामती विमानतळाची धावपट्टी पाहायला मिळत आहे. या धावपट्टीच्या शेजारीच अजित दादांचे विमान क्रश झाल्याचे दिसत आहे. हे विमान लँड न होता ते थेट कोसळल्याचे दिसत आहे.

अजित पवारांच्या विमान अपघाताप्रकरणी रोहित पवार यांनी या घटनेमागील संशयास्पद बाबींवर बोट ठेवले आहे.

१. विमानाचा कलणे: विमान लँड होण्यापूर्वीच एका बाजूला का झुकले? हे तांत्रिक बिघाडामुळे झाले की जाणीवपूर्वक? २. पायलटची भूमिका: या विमानाचा पायलट कोण होता आणि शेवटच्या क्षणी ट्रान्सपॉन्डर का बंद पडला? ३. विमानातील स्फोट: विमान जमिनीवर आदळताच इतका भीषण स्फोट कसा झाला? विमानात काही स्फोटक द्रव्ये होती का? ४. सुरक्षेतील त्रुटी: बारामती विमानतळासारख्या सुरक्षित ठिकाणी अशा प्रकारची दुर्घटना घडणे ही मोठी त्रुटी आहे. ५. राजकीय कट: अजित पवार हे सावध झाले होते, ते स्वतःच्या बाटलीतून पाणी पीत होते. अशा परिस्थितीत विमान कोसळणे हा योगायोग आहे की कट? असे काही सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केले आहे.

अजित पवारांच्या विमानाचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर हा केवळ अपघात वाटत नाही. याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. या घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जाण्याची शक्यता आहे.

[embedded content]



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *