Ajit Pawar : अजित पवार आज संभाजीनगर दौऱ्यावर; गोंधळ होण्याची चिन्हे, मराठा आंदोलकांना घेतलं ताब्यात

Ajit Pawar :  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज दिवसभर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. संभाजीनगर जिल्ह्यातील ४३ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान मराठा समाजाकडून अजित पवारांच्या दौऱ्याव विरोध केला जात आहे.

संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर येथे ४३ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन सकाळी १०:३० वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाध्यक्षपदी प्रसिद्ध लेखक प्रा. डॉ. जगदीश कदम यांची उपस्थिती राहणार आहे. मात्र या संमेलनाला अजित पवारांनी येऊ नये म्हणून सकल मराठा समाजाने आवाहन केले आहे.

Parola Accident : पारोळ्याजवळ भीषण अपघात..अंत्ययात्रेला जाताना काळाची झडप; कंटेनरच्या धडकेत ३ ठार, २१ गंभीर

त्यामुळे या संमलेनाच्या सुरुवातीलाच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गोंधळ होण्याची चिन्हे आहेत. अजित पवार हे सकाळी १० वाजता हेलिकॉप्टरने कार्यक्रमस्थळी दाखल होतील. त्यानंतर ते दोन ठिकाणी खाजगी कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. दुपारी तीनच्या सुमारास संभाजीनगर जिल्ह्याची आढाव बैठक घेणार आहेत.

आंदोलकांना घेतलं ताब्यात

अजित पवारांच्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या गंगापूर तालुक्यातील दोन आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या आंदोलकांनी अजित पवारांच्या दौऱ्याला विरोध करणाचं पत्र दिलं होतं. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत गंगापुरात न येण्याचे आवाहन या पत्रातून करण्यात आले होते.

आमचा साहित्य संमेलनास विरोध नसून त्याठिकाणी संमेलनाच्या आडून काही राजकीय मंडळी स्वतःचा प्रचार करत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असताना शासनाने अजूनही मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास तयार नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाने संविधानिक पदावर असलेल्या राजकीय पुढाऱ्यांनी जनतेत येऊ नये, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने घेण्यात आली होती.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply