Ajit Pawar : अजित पवारांनी मीरा बोरवणकर यांचे आरोप फेटाळले, आरोपांना सविस्तर उत्तर देत म्हणाले...

Ajit Pawar : पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी अजित पवार यांच्यावर आपल्या पुस्तकातून गंभीर आरोप केले आहेत. पुण्याचे तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी तीन एकर जमीन एका खासगी विकासकाला देण्याचा घाट घातला होता, असा आरोप मीरा बोरवणकर यांनी केला आहे. 

मात्र अजित पवारांनी दावा फेटाळत जमिनीबाबत आपल्याला असा कोणताही अधिकारच नसल्याचे स्पष्ट केले. येरवडा येथील ३ एकरची जागा खासगी विकासकाला देण्याच्या प्रस्तावाशी माझा काहीही संबंध नसल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.

Nashik Drug Case : झोपडपट्टी, पान टपरी, शाळा, कॉलेज, ढाबे आदींवर पोलिसांची नजर, ड्रग्ज प्रकरणी पालकमंत्री दादा भुसेंचे कारवाईचे आदेश

संबंधित प्रस्ताव गृह विभागाचा होता, त्याच्याशी माझा काय संबध? त्यावेळी गृह विभागाचे मंत्री आर आर पाटील होते. एका प्रकरणात यातील एका कंपनीवर ईडीने कारवाई केली. त्यामुळे हा प्रस्ताव सरकारनेच पुढे रद्द केला. आजही ही जागा सरकारच्या ताब्यात आहे. हा प्रस्ताव कुणामुळे बदलला गेला नाही, असं म्हणत अजित पवारांनी मीरा बोरवणकर यांचा दावा खोडून काढला.

मीरा बोरवणकर यांच्या पुस्तकात अनेक गोष्टी आहेत, पण याच विषयाची चर्चा सुरु आहे. यातून अधिक प्रसिद्धी मिळते म्हणून असं सुरु असेल. विरोधकांनी चौकशीची मागणी केली, तो त्यांचा अधिकार आहे. तुम्ही चौकशी करा आणखी काहीही करा. कोणाची चौकशी करणार? जमिन तिथेच आहे, अनेक अधिकाऱ्यांनी जाऊन पाहणी सुद्धा केली आहे, असंही अजित पवार यांनी म्हटलं.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply