Ajit Pawar News : अजित पवार यांचा पुणे जिल्हा बॅंक संचालकपदाचा राजीनामा; कारण काय?

Ajit Pawar News : राजकीय वर्तुळातून एक मोठी उडामोड समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा बॅंकेच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या ३२ वर्षांपासून अजित पवार या बॅंकेचे संचालक होते. मात्र सध्या राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या व्यापामुळे अजित पवार यांनी हा राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हा बॅंकेच्या संचालकपदाचा आज राजीनामा दिला. गेली 32 वर्ष अजितदादा पवार हे जिल्हा बँकेवर प्रतिनिधित्व करत होते.

Dasara Melava: 'बाळासाहेबांनी अंगार फुलवला, तिथे वैचारिक भंगार ऐकायला कोण जाणार', दसरा मेळाव्यावरून शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

मात्र सध्या उपमुख्यमंत्री पदाचा वाढता व्याप आणि पक्षाची वाढती जबाबदारी यामुळे त्यांनी हा राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांनी अजित पवार यांनी याबाबत माहिती दिली आहे. तसेच अजित पवारांनी राजीनामा दिला असला तरी त्यांचे मार्गदर्शन घेत राहू असेही ते यावेळी म्हणाले आहेत.

दरम्यान, अजित पवारांना महायुतीत सहभागी होऊन १०० दिवस पुर्ण झाली आहेत. सध्या राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा वाद निवडणूक आयोगासमोर सुरू असून अजित पवारच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा दावा वकिलांनी केला आहे. तसेच सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजित पवार यांच्यासमोर पक्षसंघटना मजबुत करण्याचेही मोठे आव्हान आहे. 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply