Maharashtra Politics: राज्यात पुन्हा राजकीय भूकंप? CM शिंदे तडकाफडकी दिल्लीला, अजित पवार मुख्यमंत्री होणार?

Maharashtra Politics: :  राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक महत्वपूर्ण घडामोड समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी रात्री अचानक दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत. मुख्यमंत्र्यांचा हा नियोजित दौरा नाही, अचानक ते दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

राज्यात सध्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहेत. त्यातच अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होत आहे. रायगडमध्ये दरड कोसळून मोठी दुर्घटना देखील घडली आहेत, या सर्व घटनांनी राज्य हादरवून गेलं असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला रवाना झाल्याने राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार का? असे तर्क वितर्क लावले जात आहेत.

Mumbai Rain Updates : मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची दाणादाण; अंधेरी सबवे बंद, मध्य रेल्वेची वाहतूकही उशीराने

अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार?

वर्षभरापूर्वी ज्या शिंदे गटाने अजित पवारांविषयी तक्रार करत शिवसेनेतून बंड केलं होतं, आता तेच अजित पवार युती सरकारमध्ये सामील झाले आहेत. अजित पवार यांच्या एन्ट्रीमुळे शिंदे गटात संभ्रमाचं वातावरण आहेत. त्यातच अजित पवार हे महाराष्ट्रातील मनातील मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर्स मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवास्थानाबाहेर झळकले आहेत.

त्यामुळे शिंदे गटातील नेत्यांचं टेन्शन वाढल्याची माहिती आहेत. दुसरीकडे अजित पवार यांच्या गटातील आमदार अमोल मिटकरी यांनी सुद्धा अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एक सूचक ट्वीट केलं आहे. अजित पवार हे लवकरच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, असं ट्वीट अमोल मिटकरी यांनी अजित पवारांच्या वाढदिवशी केलं आहे.

अमोल मिटकरी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून अजित पवारांचा एक व्हिडिओ ट्विट केला. या व्हिडिओला त्यांनी 'मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की......! लवकरच #अजितपर्व' असे कॅप्शन दिले. अमोल मिटकरी यांनी केलेलं ट्वीट जोरदार व्हायरल होत आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply